पोलिस अन् दरोडेखोर समोरासमोर; पुढे काय घडले वाचाच...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020


शहर व परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या शहरातील दोन सराईत गुन्हेगार बंधूंचा समावेश असणाऱ्या टोळीच्या देगलूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तरी यातील तीन गुन्हेगार मोटरसायकलवर पळून जाण्यात यशस्वी झाल्याने शहरात भितीयुक्त दहशत पसरली आहे. 

देगलूर, (जि. नांदेड) ः शहर व परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या शहरातील दोन सराईत गुन्हेगार बंधूंचा समावेश असणाऱ्या टोळीच्या देगलूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तरी यातील तीन गुन्हेगार मोटरसायकलवर पळून जाण्यात यशस्वी झाल्याने शहरात भितीयुक्त दहशत पसरली आहे. 

हेही वाचा - कोरोना ब्रेकिंग - नांदेडला दिवसभरात सात पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ३९८ वर

दरम्यान शेख इसाक रा. गुमदबेस देगलूर, शेख रहीम शेख गफूर रा. मेंडका तालुका मुदखेड यांना देगलूर पोलिसांनी गुरूवारी (ता.दोन) रोजी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना (ता.आठ) जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (ता.एक) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील ‘एसबीआय’ बँक कॉर्नर जवळ काही सराईत गुन्हेगार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामध्ये शहरातील रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार बंधूंचा समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या परिसरात नजर ठेवून शेख इसाक गुमद बेस, शेख रहीम शेख गफूर रा. मेंडका यांना अटक केली. तर इसाकचा भाऊ शेख सोहेल सह ईतर दोन जण मोटरसायकलवरून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून छऱ्याचे पिस्तूल दोन लोखंडी रॉड व एक मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. 

शहरात खळबळ
सायंकाळी बाजारपेठेत ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली शहर व परिसरात सध्या या घटनेमुळे दहशत पसरली आहे. पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी मोहन कंधारे, लुंगारे, मलदोडे, यमलवाड यांनी या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. सध्यातरी होणारी अप्रिय घटना टळली आहे. या प्रकारचा तपास पोलिस उपनिरीक्षक पुनम सूर्यवंशी या करीत असल्याचे सांगण्यात आले.

पथकाची नेमणूक
शहरातील घुमटवेस भागात राहणारा शेख इसाक व त्याचा भाऊ शेख सोहेल हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडी व इतर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यांच्या दोन इतर दोन साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली असून सीमाभागातील पोलिस ठाण्यांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घटनास्थळाला पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरोदे यांनी भेट दिली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून लवकरच फरार तीन-तीन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येतील अशी माहिती पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police And Robbers Face To Face Read What Happened Next, Nanded News