सख्या भावाचा खून करणाऱ्या भावाला पोलिस कोठडी, काय आहे प्रकरण...वाचा ? 

प्रकाश जैन
Monday, 27 July 2020

ही घटना शनिवार (ता. २५) नागपंचमीच्या दिवशी रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सिरंजनी रस्त्यावर शेतीच्या वादातून सख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घआलून ठेचून खून केला. ही घटना शनिवार (ता. २५) नागपंचमीच्या दिवशी रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

सिरंजनी (ता. हिमायतनगर) येथील अंबादास परमेश्वर अंबेपवाड (वय ३५) हा आपले गांव सिरंजनीकडे जात असताना हिमायतनगर शहरापासून दिड कि. मी. अंतरावर रस्त्यावरील राजेश्वर गॅस एजन्सीजवळील जन्नावार यांच्या शेताजवळ मयत देविदास परमेश्वर अंबेपवाड व त्यांचा सख्खा भाऊ अंबादास परमेश्वर अंबेपवाड यांचे शेतीच्या वादातून जोरात व कडाक्याचे भांडण झाले. कडाक्याच्या भांडणात दगडाने ठेचून देविदासचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. सदर भांडण हे जवळपास बराचवेळ सुरू असलेल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळावरून मोबाईल, चप्पल, डोक्यात घातलेला विस ते पंचवीस किलोचा दगड व मयताची मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली.

हेही वाचाGood news : आता कोरोना चाचणी लवकर होणार, मिळाल्या पाच हजार अॅन्टीजेन रॅपिडटेस्ट कीट

मयताच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता

देविदासचा खून इतका निर्दयीपणे करण्यात आला असून मयताच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. सदर खून हा शेतीच्या वादातून झाला असल्याचे सांगितले जात असताना मात्र ह्या खूनाचे कारण पोलीस तपासाअंती स्पष्ट होणार आहे. घटनास्थळी राञीच पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळावरून मयताचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयात रविवारी दुपारी एक वाजता शवविच्छेदन करूण प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

सिरंजनी रस्ता संवेदनशील रस्ता बनला

सिरंजनी रस्ता संवेदनशील रस्ता बनला असून सदर रस्त्यावर गेल्या पाच सहा वर्षेंपासून गभीर स्वरूपाचे गुन्हे  घडल्याने या रस्त्यावर पोलीसांनी राञीची गस्त घालावी. अशी मागणी नागरीकांतून केली जात आहे. फिर्यादी मयताची पत्नी सुजाता देविदास अंबेपवाड (वय ३० वर्ष) रा. सिरंजनी यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिसांत आरोपी मयताचा भाऊ अंबादास परमेश्वर अंबेपवाड, व बाबुराव सखाराम दंतलवाड, रा. दोघेही सिरंजनी तसेच रवि मिस्त्री हिमायतनगर यांचेवर पोलीसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला. ह्यातील तिसरा आरोपी रविचा गुन्ह्यात सहभागी आहे किंवा नाही यांचा तपास पोलिस करीत   आसल्याचे पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी सांगितले आहे.   

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police custudyl to brother who murdered his brother, what is the case read nanded news