esakal | पोलिस दलातील कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांस 60 लाखांचा धनादेश सुपूर्त- एसपी प्रमोद शेवाळे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना पोलिस कर्मचारी राम गंगाराम आलुरे यांना त्रास होत असल्याने ते होम आयसोलेशन झाले होते

पोलिस दलातील कोरोना योद्ध्याच्या कुटुंबियांस 60 लाखांचा धनादेश सुपूर्त- एसपी प्रमोद शेवाळे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियासह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते 60 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना पोलिस कर्मचारी राम गंगाराम आलुरे यांना त्रास होत असल्याने ते होम आयसोलेशन झाले होते.त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात देगलूर येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर करुन आणि मृत्यू झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत पोलिस महासंचालक यांना अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानुसार संबंधित विभागाने कोरोना योद्धा रामलु आलुरे यांच्या कायदेशीर वारसदारास विशेष अर्थसहाय्य व कोवीड- १९ नुकसान भरपाई सानुग्रह अनुदान मंजूर झाले. 

अनुदान 60 लाख रुपये दिवंगत रामलु आलुरे यांचे वारसदार पत्नी शोभा आलुरे यांना वीस लाख रुपये, मुलगी सुनीता यांना वीस लाख रुपये व कविता यांना वीस लाख रुपये असा एकूण 60 लाख रुपयांचा धनादेश बँक ऑफ महाराष्ट्र देगलूरच्या नावाने पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या उपस्थितीत कुटुंबास देण्यात आला.

कोरोना योद्धा आलूरे यांनी कोरोना संकटात योग्यरीत्या कर्तव्य बजावले असून त्यांनी 26 वर्षे अविरत पोलिस दलात सेवा बजावली आहे. दिवंगत आलुरे यांच्या पाल्यांना भविष्यात शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत किंवा कोचिंग क्लासेस या विषयी असणारे अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिले.