सिडकोतील झन्ना- मन्ना जुगारावर पोलिसांचा छापा  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मे 2020

सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा २५ हजाराचा ऐवज जप्त केला.

नांदेड : सिडकोतील एका महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा २५ हजाराचा ऐवज जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी पाच वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

सिडको परिसरात असलेल्या नाईक महाविद्यालयासमोर अवधूत कोटलवार यांच्या इमारतीत झन्ना- मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळाली. यावरुन त्यांनी आपले सहकारी पोलिस हवालदार भानुदास वडजे यांना सिडको परिसरात त्यांच्या सहकाऱ्यांसह पाठविले. मिळालेल्या माहितीवरुन श्री. वडजे यांनी कोटलवार यांच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. 

हेही वाचा -  Video; मदिरालय जानेको घरसे चलता है पिनेवाला...

घरमालकासह सहा जण अटक

यावेळी घरमालक अवधुत सुधाकर कोटलवार (वय ५०), नागनाथ रामचंद्र पाचरे (वय ५३), व्यंकटी नागोराव साळवे (वय ५५), शिवाजी रामचंद्र मोरे (वय ४१) गजानन जयराम मामडे (वय ४१) आणि चंद्रशेखर दत्तात्र्य उदास यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे त्यांच्यात कुठेच शारिरीक अंतर नसुन त्यांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते. जुगार अड्ड्यावरुन नगदी ८९१० रुपये, १५ हजाराचे तिन मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा २५ हजाराचा ऐवज जप्त केला. या सर्वांना घेऊन श्री. वडजे यांनी नांदेड ग्रामिण पोलिस ठाणे गाठले. हवालदार भानुदास वडजे यांच्या फिर्यादीवरुन या सहा जुगारी व्यापाऱ्यांविरुद्ध जुगारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. कवठेकर करत आहेत. 

टपाल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मोमीटरद्वारे तपासणी:

नांदेड : कोविड- १९ या अतिशय गंभीर महामारीचा सामना अतिशय खंबीरपणे डाक विभाग करीत असल्याचे दिसून येत आहे.

नांदेडचे डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य पोस्टमास्तर डी. एम. जाधव यांनी डाक ग्राहकांसाठी व कर्मचाऱ्यांना पोस्ट ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक डाक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. डाक घरात येणाऱ्या ग्रहाकास व कर्मचाऱ्यांना थर्मोमीटरद्वारे तपासणी केली जात आहे. तसेच तोंडावर मास्क लावणे, सोशेल डिस्टंसिंग अंतर ठेवणे व हँड वॉशने स्वच्छ हात धुवूनचं पोस्ट ऑफिसमध्ये प्रवेश दिला जात आहे.

येथे क्लिक करानांदेडमध्ये काय चाललंय ?- वाळूसोबत आता माती माफिया सक्रीय

नियमाचे तंतोतंत पालन केल्या जात आहे

तसेच दररोज प्रत्येक कर्मचाऱ्याच्या काउंटरवर व पोस्टमनला हँड ग्लोज, मास्क, हँड वॉशने प्रत्येक व्यवहार झाल्याने हात स्वच्छ धुऊन घेण्याची व्यवस्था पोस्ट मास्तर यांनी केली आहे.
पोस्ट मास्तर श्री.जाधव यांनी ग्राहकांची व कर्मचाऱ्यांची काळजी सतत घेत असल्यामुळे शासनांनी दिलेल्या नियमाचे तंतोतंत पालन केल्या जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid on Zanna-Manna gambling in CIDCO nanded news