डोंगरी विकास कामावरुन किनवट- माहूरमध्ये रंगले श्रेयवादाचे रणकंदन

file photo
file photo

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : किनवट माहूर तालुक्यातील डोंगरी विकास कामासह अन्य विकास कामाचे श्रेय लाटण्याची जणू स्पर्धा निर्माण झाली आहे.विकास कामाप्रती दुरान्वये संबंध नसणारेही आता आणखी विकास कामासाठी निधी आम्ही मंजूर करून आणला आहे. या अविर्भावात सोशल मीडियावर वावरत आहेत.

लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी बाजूलाच राहिले परंतु कुठल्याही विकास कामाच्या मंजुरी, मान्यता आदेश निघाले की ते चिटोरे घेऊन मिरवण्याची पद्धत हल्ली माहूर आणि किनवट तालुक्यात आम झाल्याने व्यथित होऊन माहूर आणि किनवट सर्वांगीण विकासासाठी झटणारे, किनवट विधानसभेच्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत दुर्गम आणि डोंगराळ किनवटच्या विकासासाठी विकास निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आमदार भीमराव केराम यांनी समाज माध्यमावर चालू असलेल्या श्रेय लाटण्याच्या प्रवृत्तीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून विकास कामाच्या निविदा काढणाऱ्या सर्वच विभागांना श्रेय लाटणाऱ्याना संधी उपलब्ध करुन दिल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील असा सूचक इशाराच दिला आहे.

यासंदर्भात पुढे बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले की, मी माझे स्थानिक विकास निधी व जिल्हा वार्षिक डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडे कामाची मागणी करुन ती कामे सतत पाठपुरावा करत मंजूरी करुन घेतली असून यात अनुक्रमे माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव रस्ता खडीकरण 10 लक्ष रुपये, आष्टा येथील कर्मचारी कॉलनी रस्ता खडीकरण करणे 2. 99 लक्ष रुपये, पडसा रस्ता खडीकरण करणे 2.99 लक्ष, वाढीव-वस्ती आष्टा रस्ता खडीकरण 2.99 लक्ष, आष्टा येथील सामाजिक सभागृह करणे दहा लक्ष रुपये, उमरा- आष्टा रस्त्यावर नळकांडिपूल करणे 5.50 लक्ष रुपये, इवळेश्वर शाळा दुरुस्ती 2.50 लाख, किनवट तालुक्यातील मोजे नागझरी येथील अंगणवाडी ईमारत बांधकाम करणे, मोजे पाटोदा येथे रस्ता पेव्हर ब्लाॅक करणे दहा लक्ष रुपये, लक्कड़कोट अंगणवाडी 9. 40 लाख, अंदबोरी आंगनवाड़ी 9. 40 लाख, शाळा दुरुस्ती किनवट 5 लाख, कोठारी सीसी रस्ता 2. 99, घोटी सीसी रस्ता 2. 99 लक्ष, अंबाड़ी शिवरामखेड खडीकरण डंबरी रस्ता 15 लक्ष रुपये, जिल्हा परिषद शाळा गणेशपुर दुरुस्ती 2. 99 लक्ष,कमठाला शाळा दुरुस्ती 2. 99 लक्ष रुपये, प्रेमनगर शाळा दुरुस्ती 2.99 लक्ष, घोटी दत्तनगर शाळा दुरुस्ती 2. 99 लक्ष, कोठारी (ची.) शाळा दुरुस्ती 2. 99 लक्ष, पिंपलगांव (सी) शाळा दुरुस्ती 2. 50 लक्ष, वसवाड़ी शाळा दुरुस्ती 2. 50 लक्ष, जलधारा शाळा दुरुस्ती 2. 50 लक्ष, रोड़ा नाइक 
तांडा शाळा दुरुस्ती 2. 50 आदीसह राज्य शासनासोबत केंद्र सरकारकडून विविध विकास कामासाठी विकास निधी आणण्याचा ओघ सुरु आहे.

विकास कामाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याची भेट घेऊन सचिवालय स्तरावर पाठपुरावा करुन अथक परिश्रमानंतर ती विकासकामे आपल्या पदरात पाडून घेतो असतो. ग्रामीण भागातील विकास कामाची मंजूरी मी आमदार म्हणून माझे जनतेप्रती असलेले कर्तव्य आणि निष्ठा नैतिक दृष्ट्या पूर्णत्वास नेण्यासाठी मी तत्पर आहे. परंतु काही हौसे, गवसे, नवसे, विकास कामासाठी मंजूरी मिळताच सदर विभागाशी कुठलाही काडी मात्र संबंध नसताना सदरची कामे आम्ही मंजूर करुन आणलेत असा गाजा- वाजा करत समाज माध्यमावर व व्यक्तीश: मिरवित ग्रामीण भागातील जनते मध्ये गैरसमज  निर्माण करत आहे. विकास कामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार थांबवा अन्यथा याचे वाईट परिणामाचा सामना अशा प्रवृत्तींना निश्चित करावा लागेल.

जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे विकास साध्य करण्याचा लक्षांक गाठत असताना मला विचलित करु नका असा इशारा आमदार भीमराव केराम यांनी त्यांच्या पाठपुराव्याने आलेल्या विकास कामाचे श्रेय लाटणाऱ्या आजी- माजी तर काही नेत्यांची हुजरेगिरी करणार्‍या ना दिला आहे. विकास कामाच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थे च्या लोकप्रतिनिधींना उद्देशून केराम म्हणाले की, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासना ने सरपंच, ग्रामसेवक यांनी आपल्या स्तरावर ही विकास कामे पूर्ण करुन घ्यावित आपणास यात काही अड़चन निर्माण झाल्यास मला तातडीने थेट संपर्क करावा. मंजूर केलेल्या कामावर दावा करणाऱ्या तकलादु प्रवृत्तीच्या ठगांनी त्यांच्याकड़े काम मंजूर केल्याबाबत अधिकृत पत्र असल्यास प्रसिध्दी द्यावी परंतु फुकट श्रेय घेण्याचे घाणेरडे प्रकार थांबवावे असेही शेवटी आमदार भीमराव केराम म्हणाले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com