esakal | ज्येष्ठता डावलून दिला सचिवाचा पदभार.....कुठे ते वाचा  
sakal

बोलून बातमी शोधा

NND28KJP01.jpg

मराठवाड्यात नावाजलेल्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव डी. ए. संगेकर ता. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी बाजार समिती संचालक मंडळाने ता. २६ मे रोजी सभापती संभाजी पाटील पुयड यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली.

ज्येष्ठता डावलून दिला सचिवाचा पदभार.....कुठे ते वाचा  

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रभारी सचिवपदी सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र असलेल्या सहायक सचिवाला डावलून संचालक मंडळाने कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे पदभार दिला आहे. याबाबत सहायक सचिवाने विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांच्याकडे तक्रार करुन न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमणुक करण्याची मागणी केली आहे.

प्रभारी सचिव संगेकर झाले सेवानिवृत्त
मराठवाड्यात नावाजलेल्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव डी. ए. संगेकर ता. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी बाजार समिती संचालक मंडळाने ता. २६ मे रोजी सभापती संभाजी पाटील पुयड यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली. यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. या सभेत संचालक आनंदराव कपाटे यांनी लेखापाल एस. एस. बाऱ्हाटे यांना पदभार देण्यात यावा असे सुचविले. तर माजी आमदार तथा ज्येष्ठ संचालक ओमप्रकाश पोकर्णा यांनी सचिव पदावर शासकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात यावे असे सुचविले. 

हेही वाचा.....

सभापतींची भारसावडे यांना पसंती
सभापती संभाजी पाटील यांनी सेवा नियमात प्रभारी पदभार देण्याबाबत कोणतीही तरतुद नाही. यामुळे तुर्तास जी. एस. भारसावडे यांच्याकडे पदभार द्यावा, असे सुचविले. श्री भारसावडे यांच्याकडे पदभार देण्याच्या ठराव क्रमांक पाचचे सुचक ओमप्रकाश पोकर्णा यांनी तर अनुमोदन माजी सभापती बी. आर. कदम यांनी दिले. यामुळे ता. एक जून पासुन प्रभारी सचिवपदी अनुभवी जी. एस. भारसावडे यांची नियुक्ती झाली. 

हेही वाचलेच पाहिजे..... 

सहायक सचिवांनी घेतला आक्षेप
या नियुक्तीला सहायक सचिव डब्ल्यु. बी. पवार यांनी आक्षेप घेतला आहे. लातूर येथील विभागीय सहनिबंधकाकडे दिलेल्या निवेदनात सेवा ज्येष्ठतेनुसार आपली नियुक्ती करण्याची विनंती ता. १६ मार्च रोजी संचालक मंडळाकडे केली होती. याबाबत कोणतीही कार्यवाही न करता न्यायालयाचा आदेश डावलून कनिष्ठ कर्मचाऱ्याला नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. यामुळे तो ठराव रद्द करुन नेमणुक करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान संचालक मंडळाच्या निर्णयाबाबत विभागीय निबंधक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्य
संचालक मंडळाने सभागृहात सचिवपदाबाबत निर्णय घेतला. यावेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास प्रभारी सचिव पदासाठी प्राधान्य देण्यात आले. 
- संभाजी पाटील पुयड
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदेड.