धर्माबादेत होतोय बटाटे लागवडीचा प्रयोग

सुरेश घाळे
Saturday, 28 November 2020


तालुक्यात आजपर्यंत कधीच बटाटे या पिकाची लागवड झालेली पाहावयास मिळाली नाही. परंतु येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी नितीन ईजळकर यांनी या पिकाचा लागवडीचा पूर्ण अभ्यास करून दोन एकर जमिनीत या पिकाची लागवड केल्याने भविष्यात हा नवीन उपक्रम यशस्वी झाल्यास धर्माबाद तालुक्यात या पिकाच्या लागवडीचे क्षेत्र निश्चितच वाढणार आहे. धर्माबादचे बटाटे म्हणून हा तालुका प्रसिद्ध होण्यास वेळ लागणार नाही असे या निमित्ताने बोलल्या जात आहे. 
 

धर्माबाद, (जि. नांदेड) ः तालुक्यात आजपर्यंत कधीच बटाटे या पिकाची लागवड झालेली पाहावयास मिळाली नाही. परंतु येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी नितीन ईजळकर यांनी या पिकाचा लागवडीचा पूर्ण अभ्यास करून दोन एकर जमिनीत या पिकाची लागवड केल्याने भविष्यात हा नवीन उपक्रम यशस्वी झाल्यास धर्माबाद तालुक्यात या पिकाच्या लागवडीचे क्षेत्र निश्चितच वाढणार आहे. धर्माबादचे बटाटे म्हणून हा तालुका प्रसिद्ध होण्यास वेळ लागणार नाही असे या निमित्ताने बोलल्या जात आहे. 

नितीन ईजळकर या तरुण शेतकऱ्यांनी मागील काळात शेवग्याच्या शेंगाची लागवड केली होती. ही लागवड बघण्याकरता सर्वाधिक म्हणजे शेजारील असलेल्या तेलंगणा व आंध्रप्रदेश या भागातील शेतकऱ्यांनी हजेरी लावून या पिकासंदर्भात माहिती मिळवली. या शेतकऱ्यांकडून अभ्यासपूर्ण वेगवेगळे प्रयोग केले जातात. आता नवीनच हा बटाटे लागवडीचा प्रयोग त्यांच्या माध्यमातून होत आहे. बटाटे हे पीक तीन महिन्यात येत असल्याचे यांच्याकडून सांगण्यात आले. 

 

हेही वाचा -  जिल्हा प्रशासन पदवीधर मतदान प्रक्रीयेसाठी सज्ज-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर -

जिल्ह्यात सर्वाधिक टरबूज पिकाची लागवड 
या पिकासाठी जवळपास साडेतीन फूट या अंतरावर बेड तयार करणे आवश्यक असून या पिकाच्या बऱ्याच जाती असून ज्या जातीचे बटाटे आपण बाजारात विकत घेतो. त्याच बटाट्याच्या जातीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एकरी आलु या पिकाचे उत्पादन १०० ते १२० क्विंटल अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माबाद तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक टरबूज या पिकाची लागवड केली जाते.

 

बाजारात काय विकते हा दृष्टीकोन महत्वाचा 
शेतात आपण काय पिकवले पाहिजे यापेक्षा बाजारात कोणत्या पिकाला मागणी आहे. कुठल्या भाजीपाल्याला दर काय असू शकतात व यासंदर्भात शासनाचे काय धोरण आहे. याचा सर्व अभ्यास करूनच वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी. तसेच केंद्र सरकारने मागील सप्टेंबर महिन्यात एक बिल पास केले. त्या बिलात त्यांनी कांदा आणि बटाटे या दोन्ही गोष्टी अत्यावश्यक यादीतून वगळल्या आणि लगेच लक्षात आले की बटाटे आजपर्यंत ३० रुपये किलो यावर कधीच विकला जात नव्हता. तो आज ६० रुपये किलोने विक्री केल्या जात आहे. केंद्र सरकारच्या बटाटे पिकाच्या धोरणासंदर्भात अभ्यास करून लागवड केली असल्याचे येथील उच्चशिक्षित शेतकरी नितीन ईजळकर यांनी सांगितले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Potato Cultivation Is Being Experimented In Dharmabad, Nanded News