esakal | पब्लिक क्राय :  हॉटेल, रेस्टॉरंट तसेच मंगल कार्यालये संकटात 

बोलून बातमी शोधा

File photo

शासनाचा निर्णय कोरोनापेक्षा आमच्यासाठी जास्त घातक असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया हाॅटेल, रेस्टाॅरेंट व्यावयासिकांनी दिल्या.  

पब्लिक क्राय :  हॉटेल, रेस्टॉरंट तसेच मंगल कार्यालये संकटात 
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनाचा प्रसार थोपविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या निर्बंधामुळे अनेक लहान-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यात हॉटेल व्यावसायीक आणि मंगल कार्यालयांनाही मोठा फटका बसला आहे. पुन्हा निर्बंध लादणे म्हणजे रोगापेक्षा औषध भयंकर असा प्रकार असल्याचे त्रस्त झालेल्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

हॉटेल उद्यागात नवे निर्बंध लागू करण्याचा दिवस काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. कोरोनाविरुद्ध लढण्याचे उपाय हेच आमच्यासाठी कोरोनापेक्षा जास्त घातक ठरत आहेत. नवा निर्णय हा हॉटेल उद्योगाच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत. नव्या निर्बंधामुळे आम्हाला टिकाव धरणेच अशक्य होईल. फक्त पार्सल देऊन आम्हाला कर्मचाऱ्यांचे वेतन, परवाना शुल्क, वीजबिल आदी खर्च करणेही कठीण होईल, अशी भीती हॉटेलचालकांमध्ये निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - कोरोना फिव्हरमध्ये खेकडा आणि गावरानी अंड्याची मागणी वाढली

लग्न सोहळ्यांचा बॅंड वाजला 
शासनाच्या आदेशानुसार पोलिसांची परवानगी घेऊन शनिवारी व रविवारी विवाह समारंभाचे आयोजन करता येणार आहे. मात्र या दिवशी सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करण्याची परवानगी तसेच खासगी वाहनेही चालवण्याची परवानगी नाही. एप्रिल महिन्यात २४ ते २७ तारखेपर्यंत लग्नासाठी सलग मुहूर्त आहेत, तर ३० एप्रिलला या महिन्यातील शेवटचा मुहूर्त आहे. २४ आणि २५ तारखेला शनिवार, रविवार असल्याने संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. 

हे देखील वाचाच - ऐकावे ते नवलच : रस्ता दुरुस्ती दाखवण्यासाठी डांबरी रस्ताच उखडून टाकला
  
आरटीपीसाआर चाचणी बंधनकारक 
लग्न सोहळ्यासाठी फक्त ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. उपस्थित सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी तसेच लसीकर करून घेणे बंधनकारक असल्याचे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे. अन्यतः त्या व्यक्तीला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. सोबतच संबंधित मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाला दहा हाजारापर्यंतचा दंड देखील भरावा लागणार आहे. 

घरची आर्थिक परिस्थित बिकट असल्यामुळे शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये काम करून शिक्षण घेत आहे. लॉकडाउनमुळे रेस्टॉरंट बंद असल्याने शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या मी वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात आहे. 
- साईनाथ बगाटे (कामगार) 
  
वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले आहे. आई दुसऱ्याच्या घरी धुणी-भांडीची कामे करून कसाबसा संसाराचा गाडा हाकत आहे. आईला हातभार लागावा म्हणून मी हॉटेलमध्ये वेटरचे काम करत आहे. हॉटेल बंद असल्याने जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. 
- कल्याण सुरडकर (कामगार)