अन् ज्वारीचे पीकच कापून आणले दुकानात

dhrmabad.JPG
dhrmabad.JPG
Updated on

धर्माबाद, (जि. नांदेड) : तेलंगणातील मुधोळ तालुक्यातील सालापूर येथील शेतकऱ्याने खरेदी केलेली बियाणे बोगस निघाले असून ज्वारीला कणसेच लागली नाहीत. कडबा मात्र भला मोठा वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक वेळा शेतकऱ्याने सदरील दुकानदाराला सांगूनही काहीच उपयोग झाला नसल्याने शेवटी वैतागून सोमवारी (ता. ११) शेतातील ज्वारीचे पीकच कापून आणून दुकानदाराच्या दारात टाकले. त्या वेळी शेतकऱ्यांनी एकच गोंधळ केला.

इनानी फर्टिलायझर्सने बोगस बियाणे अनेक शेतकऱ्यांना विक्री केले असल्याचा प्रताप या वेळी उघडकीस आला. धर्माबाद हे महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर वसलेले आहे. त्यामुळे तेलंगणातील बहुतांश शेतकरी बियाणे खरेदीसाठी धर्माबाद बाजारपेठेत येत असतात. तेलंगणातील मुधोळ तालुक्यातील सालापूर येथील शेतकरी सुभाष नामदेव वाघमारे यांनी (ता. सात) फेब्रुवारी २०२० रोजी धर्माबाद येथील मे. इनानी फर्टिलायझर्स बियाणे, कीटकनाशके व खताचे विक्रेते यांच्याकडून उन्हाळी ज्वारी पेरण्यासाठी विठ्ठल ज्वारीचे बॅग मागितले होते. परंतु, इनानी यांनी निर्मल कंपनीचे आर्पणा ज्वारीचे रब्बीचे सहा बॅग तीन एक्कर पेरणीसाठी शेतकऱ्याला विक्री केली. शेतकऱ्यांनी लगेच (ता. नऊ) फेब्रुवारी रोजी सालापूर येथील तीन एक्कर शेतात पेरणी केली. मात्र, बियाणे बोगस निघाल्याने त्या ठिकाणी आजपर्यंत ज्वारीला कणसेच लागली नाहीत. ज्वारीचा कडबा मात्र भला मोठा वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र व तेलंगणातही लॉकडाउन आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतीवरच अवलंबून आहे. परंतु, शेतात बोगस बियाणामुळे ज्वारी निघालीच नाही. लागवड खर्च, बियाणे खर्च, औषधी व मजूर यावर लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. इनानी यांनी बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकरी वाघमारे यांनी दुकानदाराला वारंवार तोंडी तक्रार केली, मात्र काहीच उपयोग झाला नाही.

कारवाईची प्रतीक्षा
अखेर वैतागून त्यांनी सोमवारी शेतातील ज्वारीचे पीकच कापून आणून दुकानदाराच्या दारात टाकले. त्या वेळी शेतकऱ्यांनी एकच गोंधळ केला. दुकानासमोर बरीच गर्दी जमली होती. या वेळी सालापूरचे सरपंच साहेबराव पाटील जाधव, छावाचे धर्माबाद तालुकाध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. इनानी यांनी बोगस बियाणे देऊन आपली फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी सुभाष वाघमारे यांनी तालुका कृषी अधिकारी माधुरी उदावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कृषी विभाग काय कारवाई करते, याची प्रतीक्षा शेतकऱ्यास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com