वाटमारीचा उद्देश : रस्ता अडवून शिक्षकाला मारहाण

file photo
file photo

नांदेड : आपले कर्तव्य बजावून घराकडे येत असलेल्या एका शिक्षकाला रस्त्यात अडवून जबर मारहाण केली. ही घटना मालटेकडी गुरुद्वारा परिसरातील पुलाखाली शुक्रवारी (ता. तीन) दुपारी दीड वाजता घडली. जखमी शिक्षकावर विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शहराच्या श्रीनगर परिसरात राहणारे शिक्षक सदाशिव शंकरराव बोकारे (वय ३५) हे मुदखेड येथे एका शाळेवर कार्यरत आहेत. सध्या लॉकडाउनमुळे शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षकांचे कर्तव्य सुरू आहे. नेहमीप्रमाणे श्री. बोकारे हे आपल्या शाळेत शुक्रवारी (ता. तीन) सकाळी दुचाकीवरुन गेले होते. दुपारी शाळेतील काम आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरुन ब्राम्हणवाडा मार्गे नांदेडला नमस्कार चौक मार्गे येत होते. त्यांची दुचाकी मालटेकडी गुरुद्वाराजवळ असलेल्या उड्डाणपुलाखाली येताच दबा धरुन बसलेल्या अनोळखी तिघांनी श्री. बोकारे यांना अडविले. रस्त्यात अडवून मारेकऱ्यांनी थेट त्यांच्यावर हल्ला चढविला.

तपास पोलिस हवालदार श्री. लोखंडे करत आहेत

अचानक झालेल्या या हल्ल्याने श्री. बोकारे यांना जबर धक्का बसला. मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यात व पायाने रॉडने जबर मारहाण केली. या मारहाणीत श्री. बोकारे गंभीर जखमी झाले. मारहाणीची घटना विमानतळ पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक संजय ननवरे आणि बीट हवालदार श्री. लोखंडे यांनी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या श्री. बोकारे यांना रुग्णालयात दाखल केले. घटनेचा पंचनामा करुन सदाशिव बोकारे यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार श्री. लोखंडे करत आहेत. 

विहीरीत पडल्याने एकाचा मृत्यू 

चिकाळा तांडा लहान (ता. मुदखेड) येथील विनायक बाबू राठोड (वय २१) हा युवक विहीरीतून पाणी काढत असताना त्याचा तोल गेला व विहीरीत पडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना ता. २८ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

चिकाळा तांडा लहान येथे ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीवरुन सर्व गावकरी पाणी शेंदतात. विनायक राठोड हा युवकही पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरुन तोल गेल्याने तो थेट विहीरीत पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती बाबू गोपा राठोड यांच्या माहितीवरुन मुदखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. पवार करत आहेत.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com