

नांदेड : नांदेड विभागातील सर्व ७० रेल्वेस्थानकांवरील तिकीट काउंटरवर क्यूआर कोडद्वारे तिकीट खरेदीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना रोख पैशांशिवाय तिकीट खरेदी करणे अधिक सुलभ झाले असून, तिकिटासाठी सुट्या पैशांची समस्या दूर होणार आहे.