esakal | राहुल साळवे मारहाण प्रकरण: पाच रेल्वे पोलिसांवर न्यायालयात खटला दाखल होणार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या मारहाणीचे पडसाद संपूर्ण जिल्हाभर उमटत रेल्वे पोलिसांच्या निषेधार्थ सर्व दिव्यांग संघटनांनी आंदोलने केली होती.

राहुल साळवे मारहाण प्रकरण: पाच रेल्वे पोलिसांवर न्यायालयात खटला दाखल होणार

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : दिव्यांगांच्या आरक्षित बोगीमध्ये सामान्य प्रवाशांबाबतचा जाब विचारल्याप्रकरणी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ता. १६ डिसेंबर २०१९ रोजी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचे पडसाद संपूर्ण जिल्हाभर उमटत रेल्वे पोलिसांच्या निषेधार्थ सर्व दिव्यांग संघटनांनी आंदोलने केली होती. अखेर ता. २४ डिसेंबर २०१९ रोजी सर्व पाचही रेल्वे पोलिसांवर लोहमार्ग पोलिस ठाणे नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान दोन रेल्वे पोलिसांचे नावे स्पष्ट झाली होती. उर्वरीत तीन हिंदी भाषीक रेल्वे पोलिसांच्या नावासाठी ईतके दिवस कसे काय लागतात असा संतप्त सवाल मारहाणी दरम्यान सोबत असलेले दृष्टिहीन दिव्यांग नागनाथ कामजळगे यांच्यासह सर्व दिव्यांग संघटनांनी उपस्थित केला होता. परंतु म्हणतात ना देर आये दुरुस्त आये या म्हणीप्रमाणेच गुरुवार (ता. चार) मार्च २०२१ रोजी सहाय्यक रेल्वे पोलिस निरीक्षक अनुपमा केंद्रे यांच्याकडुन राहुल साळवे यांना सुचनापत्र देण्यात आले आहे.

राहुल साळवे यांना लेखी पत्राद्वारे कळविले

दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, मारहाणीतील आरोपी रेल्वे सुरक्षा बल नांदेडचे पोलिस यशवंत लक्ष्मण गायकवाड ( वय ४४ ), काशिनाथ गंगाराम कांबळे ( वय ५० ), रेल्वे सुरक्षा विशेष फोर्सचे तीन हिंदी भाषीक पोलिस प्रेमचंद भोलाराम धाकड ( वय २९ ), ललीत सुरेंदर ( वय २७ ) आणि दिपक सदबिर सिंह ( वय ३४ ) हे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण झालेला असुन वरिल आरोपी विरोधात न्यायलयात खटला चालविण्याकरीता लवकरच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी लोहमार्ग, औरंगाबाद यांचे कोर्टात दोषारोप पत्र सादर करण्यात येत असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अनुपमा केंद्रे, रेल्वे पोलिस ठाणे यांनी राहुल साळवे यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

loading image