esakal | उमरीतील जुगार अड्ड्यावर छापा, ४० हजार जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

त्यांच्याकडून रोख ४० हजारासह जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई बळेगाव (ता. उमरी) शिवारात मंगळवारी (ता. नऊ) दुपारी साडेतीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी केली. 

उमरीतील जुगार अड्ड्यावर छापा, ४० हजार जप्त 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : उमरी तालुक्यातील बळेगाव शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख ४० हजारासह जुगाराचे साहित्य जप्त केले. ही कारवाई बळेगाव (ता. उमरी) शिवारात मंगळवारी (ता. नऊ) दुपारी साडेतीन वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी केली. 

उमरी तालुक्यात जुगार, मटका आणि वाळू अशी तिहेरी अवैध धंदे जोरात चालतात. स्थानिक पोलिस याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच अवैध धंदे या परिसरात राजरोसपणे चालतात. तसेच या उमरी तालुक्यात गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी उमरी पोलिसांची कानउघाडणी केल्यानंतर एका जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. 

पोलिस दिसताच दोघांनी ठोकली धूम

उमरी पोलिसांना अंधारात ठेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून गस्त सुरू केली. बळेगाव (ता. उमरी) येथील भगवान गाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली झन्ना- मन्ना नावाचा जुगार सेरू होता. पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर कारावई केली. यावेळी अड्यावरून काही जुगारी पोलिस दिसताच पसार झाले. मात्र पोलिसांनी दत्ताहरी व्यंकट जाधव, मारोती माधवराव संगुरवार, शिवाजी मारोती शिंदे आणि संभाजी आत्माराम ढगे यांना अटक केली. तर पापा कावळे आणि चंदु होनशेटे यांनी पोलिस दिसताच धूम ठोकली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार पिराजी गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन उमरी पोलिस ठाण्यात वरील सहा जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. मुंडलोड करत आहेत. 

हेही वाचा धोपटी आंंदोलकांवर गुन्हे दाखल...कुठे ते वाचा... ?

जिल्हाध्यक्षपदी रमेश गांजापुरकर यांची निवड

नांदेड : राज्य कार्यकारिणीच्या मान्यतेवरुन राज्य संघटना अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित केली असून यात जिल्हाध्यक्षपदी रमेश गांजापूरकर यांची त निवड मंगळवार (ता. नऊ) रोजी करण्यात आली.

अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे राज्य संघटना अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहिर केली. यात अध्यक्ष रमेश गांजापूरकर,  उपाध्यक्ष अशोक बापसीकर, कार्याध्यक्ष किसनरावजी सावंत, महासचिव श्रीदत्त घोडजकर, संघटक प्रभाकर आरेवार, सचिव निसारोद्दीन गौस यांची नियुक्ती करण्यात आली. 

धान्य त्वरीत उचल करुन वितरणास सुरुवात करावी 

सर्व पदाधिकाऱ्यानी जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांच्या येणा-या अडीअडचणी बाबत प्रशासना सोबत बैठक आयोजीत करुन प्रश्‍न सोडविण्यास रास्तभाव दुकानदारांना सहकार्य करुन दुकानदारांच्या हिताचे प्रश्‍न सोडविण्यात यावे. जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी माहे-जून महिण्याचे धान्य त्वरीत उचल करुन वितरणास सुरुवात करावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नुतन जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर यांनी केले आहे