Nanded Rain Update: नांदेड जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain updates

जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम केला आहे. मागील रविवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पाऊस झाला.

Nanded Rain Update: नांदेड जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टी

नांदेड: जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे. मंगळवारी किनवट, माहूर, हदगाव भागात झालेल्या पावसानंतर पुन्हा बुधवारी किनवट, माहूर व भोकर या तालुक्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे या तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टीची झाली. गुरुवारी (ता. १९) सकाळी दहापर्यंत जिल्ह्यात सरासरी १८.५० दहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम केला आहे. मागील रविवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पाऊस झाला. हा पाऊस सरासरी १४.३० मिलिमीटर नोंदला गेला. यानंतर सोमवारीही जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कमी अधिक पाऊस झाला.

हा पाऊस माहूर, किनवट, हदगाव तालुक्यात बऱ्याच प्रमाणात झाला. तर इतरत्र मात्र साधारण होता. यानंतर मंगळवारी सरासरी १७.१० मिलीमीटर तर बुधवारी ४४.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी सकाळी दहापर्यंत जिल्ह्यात १८.५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस किनवट, माहूर व भोकर तालुक्यात सर्वाधीक झाला. तर बोधडी ९५, मोघाळी ७९, किनवट ७२.५० व वानोळा ६८.८० . मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टी नोंदली गेली.

हेही वाचा: Corona Update: मराठवाड्यात २४३ नवे रुग्ण, बीडमध्ये सर्वाधिक बाधित

तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
नांदेड ६.५०, बिलोली १९.७०, मुखेड १०.८०, कंधार ९.१०, लोहा ९.३०, हदगाव ६.६०, भोकर ५९, देगलूर १४.१०, किनवट ४९.४०, मुदखेड १०.९०, हिमायतनगर १२, माहूर ४९.९०, धर्माबाद ७.३०, उमरी १०.३०, अर्धापूर १९, नायगाव १३.४०. सरासरी १८.५० मिलीमीटरची नोंद झाली.

Web Title: Rain Update Heavy Rain In Four Circles In Nanded District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..