केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज नांदेडच्या दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athawale visit to nanded from Hyderabad today

केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज नांदेडच्या दौऱ्यावर

नांदेड : केंद्रीय  सामाजिक  न्याय  व सशक्तीकरण  राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवारी (ता. २१) नांदेडच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी (ता.२१) हैदराबाद येथून सकाळी साडेनऊ वाजता नांदेडकडे प्रयाण. दुपारी सव्वादोन वाजता नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी पावणेतीन वाजता आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी भाग्यलक्ष्मी निवास शिवाजीनगर फुलेनगर येथे भेट. दुपारी साडेतीन वाजता शिवाजीनगर नांदेड येथून लोहा तालुक्यातील पेनूरकडे मोटारीने प्रयाण. दुपारी साडेचार वाजता बुद्ध जयंती कार्यक्रमास पेनूर (ता. लोहा) येथे उपस्थित राहतील.

सायंकाळी सहा वाजता पेनूर येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायंकाळी सात वाजता नारायण गायकवाड यांच्या कुटुंबियांची इतवारा येथे भेट देतील. सायंकाळी सव्वासात वाजता नांदेड विश्रामगृह येथे आगमन. सायंकाळी साडेसात वाजता डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे मेळाव्यास उपस्थिती. रात्री साडनऊ वाजता नांदेड विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रविवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृह येथे बैठकीस उपस्थिती. सकाळी साडेदहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. सकाळी अकरा वाजता परभणीकडे प्रयाण करतील.

Web Title: Ramdas Athawale Visit To Nanded From Hyderabad Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top