esakal | रामेश्वरम- ओखा- रामेश्वरम उत्सव विशेष गाडीच्या सहा फेऱ्या डिसेंबरमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रामेश्वरम- ओखा- रामेश्वरम उत्सव विशेष गाडीच्या सहा फेऱ्या डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहेत.

रामेश्वरम- ओखा- रामेश्वरम उत्सव विशेष गाडीच्या सहा फेऱ्या डिसेंबरमध्ये

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड- दक्षिण रेल्वेने घोषित केल्यानुसार रामेश्वरम- ओखा- रामेश्वरम उत्सव विशेष गाडीच्या सहा फेऱ्या डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहेत.या गाड्यांचा रेल्वेप्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.
 
गाडी संख्या 06733 रामेश्वरम- ओखा ही उत्सव विशेष गाडी ता. 11 डिसेंबर ते ता. 25 डिसेंबर दरम्यान दर शुक्रवारी रामेश्वरम येथून रात्री 22.10 वाजता सुटेल आणि मदुराई, तिरुपती, काचीगुडा, नांदेड, औरंगाबाद, अहमदाबाद मार्गे ओखा येथे सोमवारी सकाळी 10. 20 वाजता पोहोचेल.

हेही वाचा चांगली बातमी : 46 तलाठ्यांना लवकरच सज्जांची जबाबदारी- जिल्हाधिकारी डॉ. विपीन -
 
गाडी संख्या 06734 ओखा- रामेश्वरम उत्सव विशेष गाडी ओखा येथून ता. 15  डिसेंबर ते ता. 29  डिसेंबर दरम्यान दर मंगळवारी सकाळी 08. 40 वाजता सुटेल आणि राजकोट, अहेमदाबाद, औरंगाबाद, नांदेड, काचीगुडा, तिरुपती, मदुराई मार्गे रामेश्वरम येथे गुरुवारी रात्री 19.15 वाजता पोहोचेल..
ही गाडी पूर्णतः आरक्षित असेल. या गाडीस 19  डब्बे असतील.

loading image
go to top