esakal | पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; २४ तासात ३४ जणांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शुक्रवारी सायंकाळी पंजाब भवन कोविड केअर सेंटरमधील एक, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील दोन, मुखेड कोविड सेंटर येथील एक व औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेला एक असे एकूण पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; २४ तासात ३४ जणांची भर

sakal_logo
By
शिवचरण वावळे


नांदेड : गुरुवारी (ता. नऊ) सायंकाळी १३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिराने पुन्हा १८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शुक्रवारी (ता. दहा) सायंकाळी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गेल्या २४ तासात ३४ बाधीत रुग्णांची भर पडल्याने आता जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५५८ इतकी झाली आहे. शुक्रवारी कंधारच्या इमामवाडी येथील एका पुरुषाचा(वय ५२) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या २५ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
 
गुरुवारी आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाघाळा येथील पुरुष (वय ४१), गोकुळनगरला पुरुष (वय ४७), मोमीनपुरा महिला (वय ५५), हबिबियानगरातील पुरुष (वय ७०), दशमेशनगर बाफना महिला (वय ५७), देगलूर नाका पुरुष (वय ४८), गणेशनगरची महिला (वय १४), विजयनगर महिला (वय ६८), वजिराबाद पुरुष (वय ५४), रविनगर पुरुष (वय ४५), धुमाळवाडी महिला (वय ४५) आणि एक पुरुष (वय २५), बिलोलीतील गांधीनगर मुलगा (वय १६), बिलोलीतील फारुख गल्ली पुरुष (वय २८), मुखेड तबंलीग गल्ली येथील ११ रुग्ण यात एक बालक (वय तीन) आणि चार पुरुष (वय १६, ४५, ४३ व २७), दोन मुली (वय नऊ आणि १३) तर चार महिला (वय ३५, ४३, २८ आणि ३०)

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यात ३० मिली मिटर पावसाची नोंद ​

शुक्रवारी सायंकाळी १६ रुग्ण पॉझिटिव्ह

मुखेडला व्यंकटेशनगर एक पुरुष (वय ४५), एक महिला (वय ३८), मुखेड वाल्मिक नगर पुरुष (वय २२), मदनलपूर मुखेड महिला (वय ५०), एक पुरुष (वय ५६), कंधारला इमामवाडी पुरुष (वय ५२), नायगावला बळवंतनगरला मुलगा (वय १२), माळाकोळी पुरुष (वय ३३), परभणीतील आनंदनगर पुरुष (वय ३४) यांचा समावेश आहे. या रुग्णांचा गुरुवारी (ता. नऊ) रात्री उशिराने अहवाल प्राप्त झाला आहे. तर, शुक्रवारी (ता. दहा) सायंकाळी १६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली. 

हेही वाचा- विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांची फेररचना ​

आत्तापर्यंत ३५८ कोरोनामुक्त 

शुक्रवारी सायंकाळी पंजाब भवन कोविड केअर सेंटरमधील एक, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील दोन, मुखेड कोविड सेंटर येथील एक व औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेला एक असे एकूण पाच रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. ३५८ आत्तापर्यंत रुग्ण घरी परतले आहेत. सध्या १७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी २६६ स्वॅब तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्याचा शनिवारी सायंकाळपर्यंत अहवाल येण्याची शक्यता असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.