esakal | खास खादीप्रेमींसाठी अल्पदरात ‘खादी’ मास्कची निर्मिती कुठे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात खादीच्या मास्कला मोठी मागणी होत असल्याने खादी समितीनेदेखील लॉकडाउनच्या काळात हजारो मास्कची निर्मिती करून अवश्यकतेनुसार खादीप्रेमींना खादीचे मास्क पुरवठा केले जात आहेत. 

खास खादीप्रेमींसाठी अल्पदरात ‘खादी’ मास्कची निर्मिती कुठे ते वाचा

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : सध्या बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. परंतु, यातील सर्वच मास्क हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आहेत असे नाही, तरीदेखील ‘कोरोना’च्या भीतीने लोक घराबाहेर पडण्यापूर्वी तोंडावर मास्क घातल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. त्यामुळे नांदेडच्या खादी ग्रामोद्योग समितीने खादीप्रेमींची आडचण लक्षात घेऊन सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा किमतीची हजारो मास्कची निर्मिती केली आहे. 

खादी मास्क गुणवत्तापूर्ण व प्रामाणीकरण केकेल्या कपड्यापासून तयार केली जात आहेत. त्यामुळे एकच मास्क रोज स्वच्छ गरम पाण्यात धुवून वापरता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे उन्हात गेले तरी हे खादीच्या कापडापासून तयार केलेले मास्क गरम होत नाही. तोंडाला घाम येत नाही. खादी ग्रामोद्योग समितीच्या वतीने मास्क निर्मिती होत असल्याचे समजल्याने खुद जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी जवळपास ५०० मास्कची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मास्कचा पुरवठा करण्यात आला. 

हेही वाचा- Nanded Breaking : आज पुन्हा तीन कोरोनाबाधित, संख्या गेली ३४ वर

जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयात खादीच्या मास्कला मोठी मागणी होत असल्याने खादी समितीनेदेखील लॉकडाउनच्या काळात हजारो मास्कची निर्मिती करून अवश्यकतेनुसार खादीप्रेमींना खादीचे मास्क पुरवठा केले जात आहेत. 

वापरलेले मास्क उघड्यावर फेकल्याने धोका अधिक

सध्या बाजारात आणि विशेषतः मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून विकली जाणारी मास्क केवळ काही तासांपूर्तीच वापरण्यास योग्य असतात. त्यानंतर ते मास्क उघड्यावर न फेकता त्याची व्यवस्थित विल्लेवाट लावणे गरजेचे असते, अन्यथा त्या मास्कपासून संसर्ग परण्याचा सर्वात मोठा धोका असतो. त्यामुळे अशी मास्क फक्त आॅपरेशन थिअटरमध्ये काम करणारे डॉक्टरच वापर करतात. आॅपरेशननंतर त्या मास्कची योग्य विल्हेवाट लावली जाते. 

हेही वाचा- व्हिडिओ - नांदेडची रेड झोनकडे वाटचाल, तरीही रस्त्यावरील गर्दी हाटेना

बाजारात मास्कची किंमत जास्त

कोरोनामुळे मास्कला अधिक मागणी असल्याचे बाजारातील काही दुकानदारांनी हेरले आहे. घरगुती टेलरकडून उपलब्ध असेल त्या कपड्यापासून मास्क शिवून घेऊन ते विक्रीसाठी ठेवले जात आहेत. यामुळे बाजारात आणि रसत्याच्या कडेला मिळणारी किंवा उपलब्ध असलेले मास्क तितके गुणवत्तापूर्ण नाहीत. तरीदेखील त्या मास्कची किंमत २० ते ४० रुपयांपर्यंत आहे. मात्र, खादी कपड्यापासून तयार केलेल्या मास्कची किंमती सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडावी म्हणून केवळ १७ रुपये इतकी किमत ठेवण्यात आली आहे.

सर्वांना परवडेल अशी किमत
खादी हे सर्वांचे आकर्षण राहिले आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खादीपासून निर्मिती होणारे मास्क हे अकर्षण म्हणून नव्हे. सामान्य व्यक्तीस रोज नवे मास्क घेणे परवडणार नाही. त्यामुळे जास्त काळ वापरता येतील व खिशाला परवतडील अशा किमतीमध्ये मास्क उपलब्ध करून देण्याचा खादीचा प्रयत्न आहे.
-ईश्वर भोसीकर,  सचिव, खादी ग्रामोद्योग समिती 

loading image
go to top