सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिसांच्या सूचना, काय आहेत वाचा...?

प्रल्हाद कांबळे
Sunday, 23 August 2020

या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून शासनाच्या नियम व अटीनुसारच गणेश मंडळांनी आपल्या गणरायाची दहा दिवस आराधना करावी

नांदेड : राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मार्गदर्शक सूचना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून शासनाच्या नियम व अटीनुसारच गणेश मंडळांनी आपल्या गणरायाची दहा दिवस आराधना करावी असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. 

देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना याप्रमाणे 

ँ ँ सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश उत्सव मंडळाने महापालिका किंवा स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. 
ँँ ँ covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत.
ँ ँ यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजपणा नसावा.
ँ ँ श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळातकरिता चार फूट व घरगुती गणपती मूर्ती दोन फुटाच्या मर्यादित असावी गतवर्षी शक्यतो पारंपारिक गणेश मूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करून किंवा मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे.
 ँ विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन करणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन गणेशोत्सव विसर्जन करण्यात शक्य झाल्यास कोरोना या रोगापासून संरक्षण होईल.  

 हेही वाचा -  दोनशे रुग्णांची शनिवारी कोरोनावर मात, नऊ जणांचा मृत्यू; १२२ जण पॉझिटिव्ह

 वर्गणीच्या नावाखाली कोणावर दबाब टाकू नये
 
ँ ँ उत्सव वर्गणी किंवा देणगी दिल्यास त्याचा स्वीकार करावा. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
 ँ  संस्कृतिक, आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंगू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावे.
 ँ आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदीचे पालन करण्यात यावे. श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
 ँ गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
 ँ श्रीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.

सुचनांचे पालन करावे 

 ँ महापालिका, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.
 ँ कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका पोलिस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे अनुपालन करावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read the instructions of the police to the public Ganesh Mandals nanded news