esakal | मुंबईहून आलेल्या दोन प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

File Photo

रविवारी दुपारी प्राप्त झालेल्या ३० अहवालात मुखेड तालुक्यातील भेंडेगाव  खर्द व भेंडेगाव ब्रद्रुक येथील २७ आणि ३२ वर्षांच्या दोन पुरुषांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

मुंबईहून आलेल्या दोन प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील १९२ संशयित व्यक्तींचे स्वॅब अहवाल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी (ता.३०) १२८ अहवाल प्राप्त झाले होते. यामध्ये मिल्लतनगरातील एका व्यक्ती अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी ८१ अहवालाची प्रतिक्षा होती. यातील ३० स्वॅब अहवाल प्राप्त झालेल्यांपैकी दोन प्रवाशांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

शहरातील लोहारगल्ली, इतवारा, कुंभारटेकडी, मुखेड आदी परिसरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील १९२ संशयितांचे स्वॅब शुक्रवारी (ता.२९) तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी शनिवारी सकाळी १२८ अहवाल प्राप्त झाले होते. यात मिल्लतनगर भागातील ३२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर रविवारी दुपारी प्राप्त झालेल्या ३० अहवालात मुखेड तालुक्यातील भेंडेगाव  खर्द व भेंडेगाव ब्रद्रुक येथील २७ आणि ३२ वर्षांच्या दोन पुरुषांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे नव्याने सापडलेले दोन्ही पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईहून खासगीबसने प्रवास करुन गावी परतले असून त्यांच्यावर मुखेडच्या कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरुअसल्याची माहिती डॉ. श्री भोसीकर यांनी दिली. 

हेही वाचा- विद्यार्थी गिरवत आहेत ऑनलाइन शिक्षणाचे धडे, कुठे ते वाचा...

३० पैकी २८ अहवाल निगेटिव्ह 

त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता १४६ इतकी झाली आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला तर ३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रविवारी (ता.३१) मे नव्याने प्राप्त झालेल्या ३० अहवालातील २८ स्वॅब अहवाल निगेटिव्ह तर दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी पाठविलेल्या स्वॅब अहवालात पाच अहवाल अनिर्णित ठेवण्यात आले. शुक्रवारी (ता.२९) एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथील आठ रुग्ण व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मुखेड येथील एक रुग्ण असे एकूण नऊ पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आतापर्यंत १४४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १०३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर उर्वरित ३३ रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील दोन स्त्री रुग्ण (वय ५२ व ५५) यांची प्रकृती गंभीर आहे. - डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड.

हेही वाचा-  Video - रोग प्रतिकारकशक्ती कशी होते कमी? ते, वाचाच

चार रुग्णांना दिली सुट्टी

शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानूसार दिवसभरात चार रुग्णांना सुट्टी देण्यात आली. यामध्ये ग्रामीण रुग्णालय भोकर येथील एक, उपजिल्हा रुग्णालय मुखेड दोन तर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातून एक अशा एकूण चार रुग्णांना सुट्टी देण्यात आली.

नांदेड कोरोना मीटर
एकुण पॉझिटिव्ह - १४६
उपचार सुरु - ३५
उपचार घेत घरी परतलेले - १०३
मृत्यू - आठ