
माहूरच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात काढण्यात आली. ६२ पैकी ४१ ग्रामपंचायतीचे सरपंच पद पुढील पाच वर्षा करिता अनुसुचित जमाती करिता आरक्षीत करण्यात आले आहे.
माहूर (जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण सोडत गुरुवारी(ता.१९) पंचायत समितीच्या सभागृहात तहसिलदार सिध्देश्वर वरणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार व्ही.टी. गोविंदवार उपस्थित होते तर निवडणूक विभागाचे प्रभु पानोडे, प्रकाश शेडमाके यांनी सहकार्य केले.
६२ ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षण पुढील प्रमाणे- अनुसुचित जमाती करिता - टाकळी, वसरामतांडा, गोकुळ नगर, लोकरवाडी, हरडफ, उमरा, आष्टा, तुळशी, वाई बाजार, अंजनखेड, सेलु, गोंडवडसा, रुपला नाईक तांडा, दिगडी कु., पानोळा, भोरड, पाचोंदा, साकुर, दिगडी धा, गोकुळ गोंडेगाव.
हेही वाचा - अर्ध्या अर्धापूर तालुक्यात महिला होणार कारभारी
अनुसुचित जमाती महीला करिता-पडसा, वडसा, सायफळ, मदनापूर, सावरखेड, सतीगुडा, सिंदखेड, म.पार्डी, करंजी, भगवती, वायफणी, चोरड, लसनवाडी, मलकागुडा तांडा, वानोळा, मुंगशी, मेडंकी, हिंगणी, बंजारातांडा, मलकागुडा तांडा, मुरली, अनुसुचित जाती महिला- अनमाळ,अनुसुचित जमाती महिला- शेकापूर
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- गुंडवळ,लखमापूर,दत्तमांजरी, नागरिकांचा मागास प्रवर्ग-मांडवा,लिंबायत, खुला महिला-तांदळा, पापलवाडी,मेट,बोरवाडी, कुपटी,ईवळेश्वर, पवनाळा, खुला प्रवर्ग-हडसणी, आसोली, लांजी, रूई, मालवाडा, महादापूर, शेख फरिद वझरा
६२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत पंचायत समितीच्या सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन- प्रल्हाद कांबळे