शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला किनवटमध्ये प्रतिसाद

nnd25sgp13.jpg
nnd25sgp13.jpg


किनवट, (जि. नांदेड)  : देशभरातील २०८ शेतकरी संघटनांनी दिलेल्या शुक्रवारी (ता.२५) रोजीच्या आंदोलनाला तालुक्यात जोरदार प्रतिसाद मिळाला. भाजपच्या केंद्र सरकारने शेती क्षेत्रासंबंधी काढलेले तीन अध्यादेश आता कायद्यात रूपांतरित होत आहेत. सरकारने काढलेल्या या अध्यादेशात शेती व शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या हवाली करण्याचा डाव आहे. बाजार समित्या उध्वस्त करून, हमी भावाचे संरक्षण काढून घेऊन, शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी हे षडयंत्र आखले गेले आहे. असे विचार या वेळी बोलतांना किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे यांनी व्यक्त केले. 


हेही वाचा -  आयुक्तांचा वसुली लिपीकांना बदल्यांचा दणका

भारतातील शेतकऱ्यांवर मोदी सरकारने केलेला हा अत्यंत घातक हल्ला आहे. अखिल भारतीय किसान सभा सामील असलेल्या २०० हून अधिक शेतकरी संघटनांचा मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने व किसान युनियनने या तीन अध्यादेशाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून किनवट तालुक्यात किनवट, इस्लापूर, शिवणी, तोटंबा, मानंसिंग नाईक तांडा, चंद्रु नाईक तांडा, मार्लागोंडा, तल्हारी, बुरकलवाडी, परोटी, नागापूर, नंदगाव, कोसमेट, दुर्गानगर आदी गावात जोरदार आंदोलने करुन काळ्या कायद्याच्या प्रतीचे दहन करण्यात आले. 

हे अध्यादेश शेतकरीविरोधी असून हे काळे कायदे वापस घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी केली. या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व अर्जुन आडे, खंडेराव कानडे, स्टॅलिन आडे, प्रभाकर बोड्डेवार, आनंद लव्हाळे, प्रकाश बोड्डेवार, प्रकाश वानखेडे, अजय चव्हाण, प्रकाश ढेरे, अंबर चव्हाण, देविदास राठोड, मांगीलाल राठोड, मनोहर आडे, शिवाजी किरवले, विठ्ठल पंधलवाड, रंगराव चव्हाण आदिंनी केले. 


आरक्षणासाठी हदगाव, हिमायतनगरमध्ये ढोल बजाओ आंदोलन 
गेल्या अनेक वर्षापासून धनगर जमातींना अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात व आरक्षण तात्काळ लागू करावे यासाठी समाज वेळोवेळी रस्त्यावर आलेला आहे. न्यायालयात गेलेला आहे, परंतु प्रत्येक सत्ताधारी हा धनगर जमातीच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेत आहे. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सकल धनगर समाज तालुका हदगाव व हिमायतनगरच्या वतीने शुक्रवारी (ता.२५) तहसील कार्यालय हदगाव व हिमायतनगर येथे ढोल बजावे आंदोलन करण्यात आले. 


अंमलबजावणी करण्यात यावी 
धनगर समाजास अनुसूचित जातीचे दाखले देऊन आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी यासह समाजाच्या विविध मागंण्याचे निवेदन शुक्रवारी हिमायतनगरात तहसीलदार जाधव यांना देण्यात आले. या वेळी आनंत देवकते, बळीराम देवकते, दतात्रय हगंरगे, बाबुराव होनमने, पांडुरंग खंदारे, महेश ताडकुले, विलास आडंगे आदी उपस्थित होते. या वेळी हदगाव तालुक्यातील डॉ. भगवान निळे, ओमकार हंडेवार, श्रीनिवास हुलकाने, दिगंबर साखरे, गजानन सुकापुरे, मारुती हुलकाणे, बाबुराव हराळे, प्रभाकर डुरके, गोविंद मिजगर, ओमकार मुलगीर, आकाश लकडे, प्रशांत खंदारे, लक्ष्मण शिरगिरे, अरविंद हुलकाणे, प्रसाद कांडले, सचिन बीटेवार, महादेव नरोटे, विठ्ठल मस्के, गजानन जायनुरे, किशन साखरे, प्रशांत विर, पांडुरंग कोळेकर, प्रभाकर दहिभाते, आनंद मस्के, ओमप्रकाश लकडे, उत्तम हातमोडे, संदेश निळे, लक्ष्मण भुसनर, साईराज साखरे, सदाशिव साखरे, बालाजी साखरे आदी समाज बांधव उपस्थित होते. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com