साळ खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे; सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांची मागणी

महाराष्ट्राच्या तेलंगाना सीमेवरील अनेक गावात भात पीक अर्थात साळ पिकविण्यात येते. या साळीच्या खरेदीसाठी निश्चित दर ठरवून देण्यात आलेले आहेत.
भात पीक
भात पीक

नांदेड : तेलंगणाच्या सीमावर्ती (Telangna border) असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भात अर्थात साळ हे पीक घेण्यात येते. या पिकाच्या खरेदीसाठी अद्याप खरेदी केंद्र (Purches center) सुरु करण्यात आलेले नाहीत. नोंदणीसुद्धा अत्यंत विलंबाने करण्यात आली होती. Rice shopping center should be started immediately; Demand from farmers in border areas

महाराष्ट्राच्या तेलंगाना सीमेवरील अनेक गावात भात पीक अर्थात साळ पिकविण्यात येते. या साळीच्या खरेदीसाठी निश्चित दर ठरवून देण्यात आलेले आहेत. तेलंगणामध्ये बांधावर जाऊन साळी खरेदी करण्यात येते. महाराष्ट्रात बांधावर जाऊन साळ खरेदी करणे तर दूरच साळ अर्थात भात पीक विकण्यासाठी ऑनलाइन नोंद करण्याची गरज असल्याची जाहिरात करुन अथवा अन्य माध्यमातून माहिती देण्यात आली नाही.

हेही वाचा - नांदेड: देशी दारुसह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त; विमानतळ पोलिसांची कारवाई

ऑनलाईन नोंद करण्याची, त्या नोंदीसाठी तलाठ्याकडून सातबारावर नोंद असण्याची, जाचक अट टाकण्यात आलेली आहे. नोंदणीची प्रक्रिया शेतकऱ्यांना कळविण्यात आलेली नाही. एकीकडे घराच्या बाहेर निघू नये अशी परिस्थिती असताना ऑनलाइनची नोंद करणे, सातबारावर नोंद असणे आणि ती असल्याची कळविणे या जाचक बाबी शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आल्या. ऑनलाइनचा कालावधीही अत्यल्प ठेवण्यात आलेला होता. शासनाचे आदेश निघाल्यानंतर त्वरित सर्वत्र प्रसृत करण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे अद्याप भात पिकाची खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरु करण्यात आलेली नाहीत.

दरम्यान सीमावर्ती भागातील समन्वयकांची याविषयी चर्चा होऊन हा विषय वरिष्ठ पातळीवर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे सोशल माध्यमातून संदेशही पाठविण्यात आलेले आहेत. प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. यानंतर प्रश्न मिटला नाही तर पालकमंत्री, कृषी मंत्री, यांच्याशी संवाद साधून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रश्न सीमावर्ती भागाची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. असे श्रीयुत मुंडकर म्हणाले. भात पीक खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी पाठवलेल्या संदेशाबाबत कृषिमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि डीएमओ काय निर्णय घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com