नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आठ एप्रिल रोजी शहरासह जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांसह फळपिकांनाही फटका बसला..पुन्हा एक दिवस तापमान ४१ अंशांवर पोचलेले असताना गुरुवारी (ता. दहा) सांयकाळी सहाच्या सुमारास नांदेड शहरासह परिसरात तुरळक पावसाने हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्याला अक्षरक्षः झोडपून काढले. गुरुवारीदेखील जिल्ह्याच्या काही भागात तुरळक सरी कोसळल्या, तर काही भागात पावसासह सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. .तर, उन्हाळी पिकालाही काही प्रमाणात फटका बसला. कापणीला आलेले ज्वारीचे पीक वादळात आडवे झाले, तर शिजवून वाळण्यासाठी ठेवलेली हळद झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा तापत असताना अवकाळी पावसाच्या अधूनमधून सरी सुरू असल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे..Theft Crime : डॉलरसह रोख रकमेची चोरी; सिडको एन-१ मध्ये घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास.गुरुवारी सायंकाळी आकाशात ढग दाटून आले होते. त्यामुळे रात्री पुन्हा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यामुळे महावितरणने काही वेळ अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित केला होता. त्याचा परिणाम नागरिकांना अंधारासह उकाड्यात राहण्याची वेळ आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.