Nanded Crime News : गोळीबार प्रकरणातील दरोडेखोर अखेर पोलिसांच्या ताब्यात

धाडसी कारवाईत पोलिसांकडूनही गोळीबार; तीन आरोपींना अटक
robber shooting case Three accused in police custody nanded crime
robber shooting case Three accused in police custody nanded crime Sakal

Nanded News : शहरातील अष्टविनायकनगर भागात मंगळवारी (ता. सात) एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर भरदिवसा गोळीबार करून त्यांच्याकडील नगदी ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. अवघ्या बारा तासांत पोलिस पथकाला आरोपींना पकडण्यात यश आले. आरोपींना पकडताना पोलिसांनी गोळीबाराचे प्रत्युत्तर गोळीबार करूनच दिले.

अष्टविनायकनगर येथील सेवानिवृत्त अधिकारी रवींद्र जोशी (वय ६८) हे ‘एटीएम’मधून पैसे काढून घरी परत येत असताना पाठलाग करणाऱ्या दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडचे ४० हजार रुपये लुटून नेल्याची घटना मंगळवारी (ता. सात) घडली. तत्पूर्वी रवींद्र जोशी यांनी एका लुटारूला पकडून खाली पाडून त्याचा प्रतिकार केल्यावर लुटारूंनी गोळीबार केला, यात ते गंभीर जखमी झाले.

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार व इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे गतीने फिरली.

माहितीगाराच्या माध्यमातून हल्ल्याच्या आधी रेकी करणारा हरदीपसिंघ बलदेवसिंघ ढिलोन यास ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने रेकी करून रोहित सतपाल कोडा (वय २५, रा. बरीवाला, मुक्तसर साहिब पंजाब), सरप्रीतसिंग ऊर्फ साजन दलबिंदरसिंग सहोता (वय २४, रा. अमृतसर, पंजाब) यांना माहिती देऊन हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

पोलिस पथकास हा आरोपी विष्णुपुरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. ग्रामीण तंत्रनिकेतन, विष्णुपुरीच्या पाठीमागील रोडवरील असदवनकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या आरोपींना पोलिसांची चाहूल लागल्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला. त्यांचा पाठलाग करीत असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी स्वरक्षणासाठी आपल्या सर्व्हिस पिस्टलमधून दोन गोळ्या आरोपींच्या दिशेने झाडल्या.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, भोकर अपर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या मार्दर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय व त्यांच्या पथकाने केली असून, या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चार लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एक गोळी आरोपीच्या पायाला लागून तो जखमी झाला, त्यास शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले ४० हजार रुपये, काळ्या रंगाची स्कूटी, कार आणि गुन्ह्यात वापरलेली एक पिस्टल आणि चाकू असा चार लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस पथकावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com