
कंधार : महिनाभरापूर्वी तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. यात ज्यांना संधी मिळणार होती, त्यांच्यात खुशी आणि ज्यांना संधीने हुलकावणी दिली अशांमध्ये गम पसरला होता. पण, आता पहिले आरक्षण रद्द होऊन एक जुलैला पुन्हा सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने पूर्वीच्या सोडतीत संधी मिळालेल्या इच्छूकांत गम, तर हुलकावणी दिलेल्या इच्छुकांत खुशीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.