

Nanded News
esakal
नांदेड: नांदेडसह मराठवाड्यात सध्या विद्यार्थ्यांचा कल मेडिकल क्षेत्रापेक्षा इंजिनिअरिंगकडे जास्त दिसत आहे. बदलते करिअर ट्रेंड, लवकर स्थैर्य मिळण्याची संधी आणि वाढत्या तांत्रिक क्षेत्रामुळे हा कल अधिक ठळक होत असल्याचे मत कोनाळे कोचिंग क्लासचे संचालक प्रा.व्ही.डी. कोनाळे, प्रा. दत्तात्रय बिरादार व अनुसया कोनाळे यांनी व्यक्त केले. आजघडीला जवळपास ७० टक्के विद्यार्थी इंजिनिअरिंग क्षेत्राची निवड करत आहेत. पूर्वी मेडिकल हे पहिले प्राधान्य मानले जात होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, असे मत त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना व्यक्त केले.