Agricultural Festival : सगरोळीत सुदृढ अन् देखणा गाढव स्पर्धा
Donkey Competition : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे बुधवारपासून तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची सुरवात झाली आहे. महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी पशुप्रदर्शन होणार असून धर्मा डॉंकी सँच्यूअरी संस्थेतर्फे ‘निरोगी व देखणा गाढव’ स्पर्धा घेण्यात येणार आहे.