
सगरोळी : परिस्थिती कशीही असली तरी मनात काहीतरी करण्याची जिद्द व यश साध्य करण्यासाठी कायम ध्येयाशी जोडले असल्यास स्वप्नपूर्ती निश्चित होते. हे सगरोळी (ता.बिलोली) येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि सरदार वसतिगृहात राहिलेल्या तुषार भीमराव खटिंग याने दाखवून दिले.