

Nanded News
esakal
नांदेड: रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा मानत विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात अनेक वर्षांपासून अखंड अन्नदान करणाऱ्या ‘साईप्रसाद’ परिवारासमोर सध्या गॅस सिलिंडर टंचाईचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र, ‘गरिबांचे ताट रिकामे राहू देणार नाही’ या निर्धाराने या सेवाभावी संस्थेने लाकडी चुलीवर स्वयंपाक सुरू ठेवत सेवा अबाधित ठेवली आहे. यासोबतच पोळ्यांची कमतरता भासू नये, म्हणून आता बाहेरून भाकरी विकत घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.