

नांदेड : सकल मराठा समाजातर्फे ता. १८ जानेवारीला येथे काढण्यात येणारा आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती श्याम पाटील वडजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता.