विश्वासू प्रवासी संघटनेच्या पुढाकारातून नांदेड बसस्थानकात स्वच्छता

प्रल्हाद कांबळे
Thursday, 28 January 2021

शंकरराव नांदेडकर व आगार व्यवस्थापक व्यवहारे यांचा सहभाग

नांदेड : बसस्थानकातील वाढत चाललेली अस्वच्छता लक्षात घेऊन विश्वासू प्रवासी संघटना व एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांची उपस्थिती होती. 

विश्वासू प्रवासी संघटनेतर्फे बसस्थानकात विविध उपक्रम राबवून प्रवाश्यांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यापूर्वी त्यांनी बसस्थानकात नामफलक लावण्यात आले. ता. 26 जानेवारी रोजी बसस्थानकातील कर्मचारी व विश्वासू प्रवासी संघटनेच्या वतीने बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, सचिव ललिता कुंभार, सदस्य रमाकांत घोणसीकर यांच्यासह आगार व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे, आगार उपव्यवस्थापक वर्षा येरेकर, वाहक बनभैरु, राजू निळेकर, श्री. शिवपुजे, स्वच्छक कर्मचारी कपिल सोनसळे, संदीप देशमुख आदी कर्मचार्‍यांची उपस्थिती होते. ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आगार व्यवस्थापक यांनी विश्वासू प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांचे आभार व्यक्त केले.

स्वच्छता अभियानात प्रवाश्यांचाही सहभाग 

स्वच्छता अभियान राबविताना पाहून मुंबईला जाणारा प्रवासी अजय दुबे यांना स्वयंस्फूर्तीने या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून साफसफाई केली. विश्वासू प्रवासी संघटना व एस. टी. महामंडळाचे कौतूक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanitation campaign at Nanded bus stand through the initiative of Faithful Passengers Association nanded news