कंधार (जि. नांदेड) : सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील श्री संत साधू महाराज कंधारकर यांच्या पालखीचे गुरुवारी (ता. १९) दुपारी टाळ-मृदंगाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात व विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. .यंदा प्रथमच पालखीत चांदीच्या रथाचा समावेश करण्यात आला. रथात ठेवण्यात आलेल्या साधू महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. शहराच्या सीमेपर्यंत पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती..साधू महाराज संस्थानात पहाटे पाचला श्री संत साधू महाराज कंधारकर यांच्या पादुकांचा महाभिषेक व पूजा, पंचपदी भजन, श्री संत एकनाथ महाराज साधू यांचे प्रवचन, महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. दुपारी बाराला मठाधिपती संत एकनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नेतृत्वाखाली पालखी सोहळ्याला सुरवात झाली. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले..केळी, बिस्कीट वाटप, शर्करा तुलाकंधार न्यायालयासमोर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बी.के. पांचाळ यांच्यावतीने पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांसाठी पाणी, केळी आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. ॲड. पांचाळ यांच्यावतीने एकनाथ महाराजांचा सत्कार करण्यात आला. ॲड. नागेश राठोडकर, ॲड. कुटे, ॲड. रवी केंद्रे, ॲड. श्रेयस धर्मापुरीकर, ॲड. सुहास मस्के, ॲड. गजानन बनसोडे आदी उपस्थित होते..बाजार समितीचे माजी संचालक राजकुमार केकाटे व राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा आम्रपाली राजकुमार केकाटे यांच्यावतीने मठाधिपती संत एकनाथ महाराज यांची शर्करा तुला करण्यात आली. माजी नगराध्य क्ष स्वप्नील लुंगारे, मधुकर डांगे, गंगाधर कांबळे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, नीलेश गौर, राजहंस शहापुरे आदी उपस्थित होते. शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनीही महाराजांचे स्वागत केले..Ashadhi Wari 2025 : परळीत ‘गण गण गणात बोते’चा गजर.दर्शनासाठी भाविकांची गर्दीपालखी सोहळ्यात सहभागी होऊन श्री संत साधू महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. त्यात काँग्रेसचे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, तालुकाध्यक्ष संजय भोसीकर, माजी आमदार रोहिदास चव्हाण, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, भाजपचे तालुकाध्यक्ष विजय धोंडगे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.