डॉ. सान्वी जेठवाणी ठरल्या मिस इंडिया प्लस साईज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanvi Jethwani became Miss India Plus Size

डॉ. सान्वी जेठवाणी ठरल्या मिस इंडिया प्लस साईज

नांदेड : मेवन प्रोडक्शन्सतर्फे देशपातळीवर विश्वसुंदरी स्पर्धा मिस इंडियाची स्पर्धा दिल्ली येथे घेण्यात आली. त्यात सर्व चाचण्या पार करत अंतिम दहामध्ये पोहोचणाऱ्या नांदेडच्या डॉ. सान्वी जेठवाणी ठरल्या दुसऱ्या मिस इंडिया प्लस साईज. प्लस साईजमध्ये मिळणाऱ्या विश्वसुंदरीचा किताब भारतातील पहिला तृतीयपंथी असल्याचा मान देखील डॉ. सान्वी जेठवाणी यांना मिळाला आहे.

नांदेडला सोमवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत डॉ. जेठवाणी यांनी ही माहिती दिली. पाचवा सीजन ता. २१ ते ता. २४ सप्टेंबर दरम्यान दिल्लीच्या विवांता द्वारका हॉटेलमध्ये झाला. सदरील स्पर्धेमध्ये वजनाने जाड असलेल्या युवती व महिलांना सहभाग नोंदवता येतो. सुंदर दिसण्याचा अधिकार फक्त आकार पुरता मर्यादित नसून ही सुंदरता मनातून असली पाहिजे, या हेतूने व जाड माणसांना सुद्धा सुंदर दिसण्याचा अधिकार आहे. हा उद्देश ठेवून ही स्पर्धा २०१७ वर्षी सुरुवात झाली.

पाचव्या वर्षी चार झोनमधून पश्चिम, पूर्व, दक्षिण व उत्तर विभागात विविध चाचण्यामधून नऊशे स्पर्धकांनी पहिली चाचणीसाठी नोंदणी केली होती. यातून प्रत्येक विभागातून वीस स्पर्धक म्हणजे ८० स्पर्धकांची निवड दिल्लीच्या अंतिम फेरीसाठी झाली. या अंतिम फेरीतून ३० पुन्हा शेवटी दहा अशा सर्व चाचण्या पार करत अंतिम दहामध्ये नांदेडचे डॉ. सान्वी जेठवाणी ठरल्या दुसऱ्या मिस इंडिया प्लस साईज.

मेव्हेन्स प्रोडक्शनचे संचालक हरदीप अरोरा यांनी विजेत्याला सुंदरी ताज स्मृतीचिन्ह व अनेक बक्षीस देऊन डॉ. सान्वी यांना मिस इंडिया प्लस साईज - २०२२ किताब दिले. यासोबत त्यांना सब टायटल म्हणून ग्लॅम गॉडस म्हणजे सुंदरतेची देवता हा किताब देखील दिला. प्लस साईज मध्ये मिळणाऱ्या विश्वसुंदरीचा किताब भारतातील पहिला तृतीयपंथी असल्याचा मान डॉ. सान्वी जेठवाणी यांना मिळाला.

नांदेडसाठी एक मानाचा तुरा रोवणारी ही उपलब्धी आहे. आज माझा वाढदिवस असून हा वाढदिवसानिमित्त मिळालेला मोठा पुरस्कार व गिफ्ट आहे. भविष्यात विविध प्रॉडक्टच्या ब्रँडसाठी साईन देखील करण्यात आला आहे. बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास ते देखील करणार आहे.

- डॉ. सान्वी जेठवाणी.