समाधानकारक : नांदेड जिल्ह्याचे उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.70 टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यात रविवारी (ता. ११) प्राप्त झालेल्या सहा हजार 37 अहवालापैकी एक हजार 759 अहवाल कोरोना बाधित आले आहेत

समाधानकारक : नांदेड जिल्ह्याचे उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.70 टक्के

नांदेड : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनतेने अधिक सुरक्षितता बाळगून शासनाने वेळोवेळी जाहिर केलेल्या आदेशाचे पालन करणे सर्वांच्या हिताचे आहे. आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यात रविवारी (ता. ११) प्राप्त झालेल्या सहा हजार 37 अहवालापैकी एक हजार 759 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 685 तर अँटिजेन तपासणीद्वारे एक हजार 74 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 55 हजार 751 एवढी झाली असून यातील 42 हजार 762 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 11 हजार 687 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. 

ता. सहा ते नऊ एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या एक हजार 50 एवढी झाली आहे. ता. सहा एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पुणेगाव नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील इजळी येथील 85 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, चैतन्य नगर नांदेड येथील 35 वर्षाची महिला, नायगाव येथील 74 वर्षाची महिला, धनेगाव नांदेड येथील 46 वर्षाचा पुरुष , तेहरानगर नांदेड येथील 35 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 30 वर्षाचा पुरुष, खडकपुरा येथील 70 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, 7 एप्रिल रोजी देगलूर कोविड रुग्णालय येथे गोकुळनगर देगलूर येथील 50 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालय येथे नायगाव तालुक्यातील हंगरगा येथील 79 वर्षाचा पुरुष, 8 एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय येथे हिमायतनगर तालुक्यातील चाकरी येथील 64 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे मंत्री नगर नांदेड येथील 74 वर्षाचा पुरुष यशोसाई रुग्णालय नांदेड येथे जुना कौठा नांदेड येथील 79 वर्षाचा पुरुष,  व्हिजन कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील वझर येथील 55 वर्षाचा पुरुष, 9 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे प्रभात नगर नांदेड येथील 74 वर्षाची महिला, अर्धापूर येथील 58 वर्षाची महिला, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील 71 वर्षाचा पुरुष, इतवारा नांदेड येथील 66 वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर नांदेड येथील 64 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालय येथे सुगाव येथील 58 वर्षाचा पुरुष, कोत्तेकल्लूर येथील 64 वर्षाचा पुरुष, भगवती कोविड रुग्णालय येथे कौठा येथील 83 वर्षाचा पुरुष असे एकूण 27 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

रविवारी (ता. ११) एक हजार 314 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 20, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 870, कंधार तालुक्याअंतर्गत 4, किनवट कोविड रुग्णालय 24, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 24, खाजगी रुग्णालय 125, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 17, नायगाव तालुक्याअंतर्गत  47 , मुखेड कोविड रुग्णालय 41, अर्धापूर तालुक्याअंतर्गत  19, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 20, हदगाव कोविड रुग्णालय 18, माहूर तालुक्याअंतर्गत  3, धर्माबाद तालुक्याअंतर्गत  10, लोहा तालुक्याअंतर्गत  38, बिलोली तालुक्यातर्गंत 34 असे एकूण एक हजार 314 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.70 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 330, देगलूर 1, कंधार 39, मुदखेड 2, हिंगोली 5, नांदेड ग्रामीण 14, धर्माबाद 30, किनवट 1, मुखेड 31, , अर्धापूर 21, हदगाव 28, लोहा 32, नायगाव 1, भोकर 52, हिमायतनगर 33, परभणी 1, लातूर 1, उमरी 47, बिलोली 16 असे एकूण 685 बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 389, बिलोली 85, हिमायतनगर 1, मुदखेड 25, कंधार 49, नांदेड ग्रामीण 55, देगलूर 54, किनवट 97, मुखेड 30, नायगाव 35, अर्धापूर 74 , धर्माबाद 19, लोहा 48, उमरी 39, हिंगोली 1, भोकर 52, हदगाव 15, परभणी 5,अहमदनगर 1 असे एकूण 1 हजार 74 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

जिल्ह्यात 11 हजार 687 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 262, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 118, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 221, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 171, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 188, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 196, देगलूर कोविड रुग्णालय 54, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 134, बिलोली कोविड केअर सेंटर 336, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 25, नायगाव कोविड केअर सेंटर 107, उमरी कोविड केअर सेंटर 20, माहूर कोविड केअर सेंटर 22, भोकर कोविड केअर सेंटर 20, हदगाव कोविड रुग्णालय 37, हदगाव कोविड केअर सेंटर 98, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 126, कंधार कोविड केअर सेंटर 31, धर्माबाद कोविड केअर सेंटर 110, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 41, बारड कोविड केअर सेंटर 45, मांडवी कोविड केअर सेंटर 14, महसूल कोविड केअर सेंटर 105, एनआरआय कोविड केअर सेंटर 121, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 146, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 812, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 610, खाजगी रुग्णालय 1 हजार 506 असे एकूण 11 हजार 687 रुग्ण उपचार घेत आहेत.

रविवारी रोजी सांयकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याचा कोरोना मिटर रविवार (ता. ११) एप्रील

 • एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 68 हजार 294
 • एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 6 हजार 296
 • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 55 हजार 751
 • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 42 हजार 762
 • एकुण मृत्यू संख्या-1050
 • उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.70 टक्के
 • स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22
 • स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-72
 • प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-389
 • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-11 हजार 687
 • अतिगंभीर प्रकृती असलेले-189.

Web Title: Satisfactory Nanded District Recovery Rate Infected Patients 7670 Percent Nanded News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..