esakal | नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, खरीप हंगाम बहरला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यावर्षी पावसाने सुरुवात चांगली केली. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या वेळेमध्ये पूर्ण झाल्याने हंगाम चांगलाच बहरला

नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, खरीप हंगाम बहरला

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : एकीकडे संबंध देशभरात कोरोनाचे संकट घोंघावत आहे. तर दुसरीकडे अनेक संकटावर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसु फुलले आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे यावर्षी पावसाने सुरुवात चांगली केली. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या वेळेमध्ये पूर्ण झाल्याने हंगाम चांगलाच बहरला असल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. विशेष करून मूग, उडीद हे पीक आता सध्या फुलोऱ्यात आल्याने ज्वारी, कापूस आणि सोयाबीन या पिकांनाही चांगला जोर धरला आहे.

जिल्ह्यात जवळपास सात लाख 42 हजार 861 हेक्‍टर क्षेत्र आहे. यात 2020- 21 मध्ये 31 जुलैपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस झाला. रोहीनी नत मृग नक्षत्र जोरदार पडल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या वेळेत केल्या. जिल्ह्यातील 7 लाख 55 हजार अठरा हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली. खरिपाच्या पेरणीची टक्केवारी ही शंभर टक्के पेक्षा अधिक असल्याचे जिल्हा अधिक्षक रविशंकर चलवदे यांनी सांगितले.

हेही वाचा कोरोनात प्रशासनाला मिळत आहे ‘या’ वाहनाची साध...कोणत्या ते वाचा

जिल्ह्यात शंभर टक्के पेरण्या

त्याखालोखाल १०७ टक्के पेरणी कंधार तालुक्यात झाली आहे. देगलूर तालुक्यातही सर्वाधिक पेरणी झाली असून ती ११५ टक्के नोंद करण्यात आली आहे. कंधार तालुक्‍यात ६० हजार ३४२ हेक्‍टर क्षेत्र असताना तालुक्‍यातील ६४ हजार ९९५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बिलोली तालुक्यात १०४ टक्के पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ नांदेड तालुक्यात २५ हजार ४९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. येथे पेरणीचे क्षेत्र २५ हजार ७३६ हेक्‍टर इतके आहे. नांदेड जिल्ह्यातही ९७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

मुग, सोयाबीन, कापूस आणि तूर व ज्वारी बहरु लागली

अर्धापूर तालुक्यात शंभर टक्के पेरणी झाली असून मुदखेड १०३ टक्के तर लोहा तालुक्यात १०१ टक्का, मुखेड तालुक्यात १०१, नायगावमध्ये ९७ टक्के, धर्माबादमध्ये एकशे तीन टक्के, किनवटमध्ये ९९ टक्के, हिमायतनगर मध्ये शंभर टक्के पेरण्या झाल्या. तृणधान्याचे जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण ५५ हजार ४० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यात ३१ जुलैअखेर ३३ हजार ११३ एकर क्षेत्रात कडधान्याची पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ३१ हजार ४८१ हेक्‍टर क्षेत्रात ज्वारीची पेरणी झाली.

येथे क्लिक करा कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांना पहिला डॉ. प्रज्ञा स्मृती सन्मान

सोयाबीनसोबत कापूसही लागवड चांगली

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पिके सोयाबीनचे आहे. सोयाबीनची पेरणी जिल्ह्यात सर्वाधिक झाली असून तीन लाख नऊ हजार ७२५ असताना ३१ जुलैअखेर तीन लाख ८० हजार ३५३ क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाची जिल्ह्यात ३० टक्के पेरणी झाली.

बनावट सोयाबीन बियाने कंपन्यावर गुन्हे दाखल

यावर्षी मान्सून वेळेवर आल्याने खरीप पिके जोरदार बहरली आहेत. सुरुवातीला काही भागात सोयाबीन पीक उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या मात्र त्यातही संबंधित कंपन्याविरुद्ध गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सध्या मुग फुलोऱ्यात आला असून त्याला काही भागात शेंगाही लागत आहेत तर कापूस, सोयाबीन, तूर ही प्रमुख पिकेही चांगल्या दर्जाची आली असल्याचे श्री. चलवदे यांनी सांगितले आहे.