समाधान कारक पावसाने शेतकरी सुखावला, पिकांना पहिली पाळी सुरु...

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : यंदा पाऊस चांगला होणार या आशेने जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राचा पाऊस होताच जुनच्या दुसऱ्याच आठवड्यात सोयाबीन, कपाशी लागवड सुरु केली होती. परंतु बहुतेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. शेतकरी हतबल न होता. दुबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने सध्या सोयाबिन आणि कापुस वाऱ्यावर डोलु लागल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे.

एकंदरीत हवामान आणि मुबलक पाणी असल्याने जिल्ह्यात यंदा सुद्धा गेल्या वर्षी प्रमाणेच जिल्ह्यात चार लाख हेक्टरवरच्या जवळपास सोयाबीनची पेरणी झाली असून, सोयाबीन पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल याची अशा आहे. सध्या दुबार पेरणीनंतर शेतामधील पिके चांगलिच वाऱ्याला लागली आहेत. पावसाची साथ देखील मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी पिकांना पहिली पाळी (अंतर) करण्यास सुरवात केली असल्याचे चित्र दिसत आहे. 

समाधान कारक पावसामुळे पेरणी 

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरणीस सुरवात होत असली तरी, १५ जुलैपर्यंत पेरणीचा हंगाम सुरु असतो. त्यामुळे पहिलाच पाऊस झाला आणि पेरणीला सुरुवात करण्याची घाई करण्याचे कारन नसते. असे शेती तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिला पाऊस पडल्यानंतर लगेच पेरणीची घाई करु नये असे कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून सांगण्यात येत होते, तरी देखील मृसर्गगाचा पाऊस चांगला झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करत निसर्गाच्या लहरीपणा किंवा बियाण्याच्या परवाह न करता केलळ समाधान कारक पाऊस झाला म्हणून उत्साहाने पेरणी करण्यास सुरुवात केली होती.

बोगस बियाणे उत्पादकावर गुन्हे

मात्र सोयाबिनचे बियाणे बोगस निघाल्याने सोयाबिन उगवलचे नसल्याच्या साडेचार हजार शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्यानंतर लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाने देखील या विषयाची गंभीर दखल घेत थेट बियाने तयार करणाऱ्या कंपनीमालकावरच गुन्हे दाखल करण्याचा धाडशी निर्णय घेतला गेला. शेतकऱ्यांना पुन्हा बियाने पुरविण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणी केली आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने आज पुन्हा शेतकरी आनंदित झाला असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभरात कापुस आणि सोयाबिन पिकांची मशागत पहिली पाळी सुरु झाली आहे.  


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com