"एकंदरीत प्रतिबंधित चिनी मांजा दोऱ्यावर बंदी असतानाही पतंग शौकीनाकडून पतंग काटाकाटी करिता चिनी मांजा वापरला जात आहे."
कळमनुरी : पतंग (Kite) उडविण्यासाठी वापरण्यात आलेल्या नायलॉन मांजा (Nylon Manja) पायात अडकून चिमुकली गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. नऊ) घडली. नायलॉन मांजा वापरणे व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आल्यानंतरही राजरोसपणे शहरात पतंग उडवणाऱ्या शौकिनांकडून हा मांजा वापरला जात आहे. विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्यानंतर पालिका प्रशासनाने आता मांजा विक्रीच्या ठिकाणांचा शोध चालवला आहे.