दुसऱ्यांदा बहुल्यावर चढताच हातात बेड्या, कुठे ते वाचा?

प्रल्हाद कांबळे
Monday, 10 August 2020

पहिल्या पत्नीला सजताच तीने थेट पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली. यावरुन दुसऱ्यांदा बहुल्यावर चढणाऱ्या पतीविरुद्ध रविवारी (ता. नऊ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : पहिल्या पत्नीला माहेराहून पैशाची मागणी करुन तिला घराबाहेर हाकलून देऊन दुसरे लग्न केले. मात्र ही बाब पहिल्या पत्नीला सजताच तीने थेट पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली. यावरुन दुसऱ्यांदा बहुल्यावर चढणाऱ्या पतीविरुद्ध रविवारी (ता. नऊ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नांदेडच्या सिडको व मुदखेड परिसरत घडली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुदखेड (जिल्हा नांदेड) येथील एका विवाहितेचा जानेवारी ते जुलै २०१९ दरम्यान शारिरीक व मानसिक त्रास देणे सुरू केले. चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तिला सतत उपाशीपोटी ठेवून तिला मारहाण करत असत. या त्रासाला कंटाळून तिने आपले माहेर गाठले होते. त्यानंतरही पती व सासरची मंडळीचा त्रास देणे काही कमी होत नव्हते. शेवटी आपल्याला होणारा त्रास कमी व्हावा व संसार सुरळीत चालावा यासाठी तिने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहायक कक्षात तक्रार दिली होती. तेथेही पती व त्याच्या नातेवाईकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या वागण्यात काही बदल होत नव्हता.

हेही  वाचारस्त्याचा परिसरच बनला मदिरालय; कुठे ते वाचा

पहिली पत्नी असताना दुसरीशी घरोबा

सासरी व माहेरी असतांना तिचा त्रास वाढतच गेला. शेवटी तिला मारहाण करून, शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी देऊन घराबाहेर हाकलून दिले. काही दिवस गेल्यानंतर तिच्या पतीने बेकायदेशीरपणे दुसरे लग्न करून पहिल्या पत्नीचा विश्‍वासघात केला. ही बाब पहिल्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार दिली. सोबत पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षाचे पत्रही तिने आपल्या तक्रारीसोबत जोडले होते. 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा

पिडीत विवाहितेच्या तक्रारीवरून पती शेख अब्‍दुल रहीम, अजमेरी बेगम, समीरा बेगम, शर्मिन शेख, शेख अथर सर्व राहणार मुदखेड, आसिया बेगम आणि शेख नयुम राहणार उस्माननगर (ता. कंधार) यांच्याविरुद्ध विवाहितेच्या छळासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार श्री गवळी करत आहेत. याप्रकरणी तपासीक अमलदार श्री. गवळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाला असून आरोपी अजून पकडायचे आहेत. त्यांना लवकरच अटक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second marraige husband on affence where to read it nanded news