नांदेड पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा 

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी व कोरोना योद्ध्यांनी आपल्यासह समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. पहिल्या लाॅकडाउनपासून आजपर्यत सतत ऊन- पाऊस झेलत सतत शहराचा बंदोबस्त व नाकाबंदी करण्यासाठी नेहमी सतर्क राहणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यात शिवाजीनगर पोलिसांनी दोन मोठ्या कारवाया करुन सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. हे पोलिस अधिकारी यातून लवकर बरे होतील अशी आशा नांदेडकर व्यक्त करत आहेत. 

शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून लाॅकडाऊन लावण्यात आला होता. या लाॅकडाऊनची अर्ध्या शहराची जबाबदारी असलेले अधिकारी यांनी सतत रस्त्यावर उभे राहून वाहतुक सुरळीत करुन नांदेडकरांना विश्वासत घेत कामाशिवाय घराबाहेशहरातील नागरिकांना कोरोनाची बाधआ होण्यास सुरुवात झाली. आज घडीला जिल्ह्यात दीड हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण बाधीत झाले. यात सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही फटका बसला. फ्रन्टलाईनवर लढणारे पोलिसही यात सुटले नाही. तरीपण हिम्मत न हारता आजही त्यांचा बंदोबस्त व गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे काम अविरत सुरु आहे. 

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम एकजुटीने या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. २४ तास नांदेडकरांच्या सेवेत राहणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल मंगळवारी (ता. २८) रात्री नऊच्या सुमारास पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर मात्र पोलिस दलात एकच खळबळ उडाली. पोलिस दलातील यापूर्वी माळाकोळी, वजिराबाद, धर्माबाद, विमानतळ सुरक्षा, बारड, मरखेल, कुंडलवाडी आदी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बाधीत झाले होते. मात्र त्यांनी कोरोनावर मात करत पुन्हा नांदेडकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत. पोलिस विभागातील मोहरे जर या कोरोना बाधीत होत असतील तर सर्वसामान्य व निष्काळजी करणाऱ्या नांदेडकरांबद्दल न बोललेले बरे. 

नांदेडकरांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे

मंगळवारी बाधीत झालेले पोलिस अधिकारी नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनावर मात करुन नांदेडकरांच्या सेवेत काही अधिकारी दाखल झाले नसतानाच पुन्हा एका वरिष्ठ पोलिस अधिकारी बाधीत झाल्याने पोलिसांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. पोलसि कर्मचाऱ्यांना पीपीई कीट व मास्क, सॅनिटायझर व रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी औषधी देणे आवश्यक आहे. सर्वाची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांना कोरोनाची लागन झाली तर नांदेडकरांची सुरक्षा रामभरोसे होईल त्यासाठी पोलिस तंदुरुस्त राहिला पाहिजे. नांदेड शहरात सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असतांना नांदेडकरांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com