Nanded News : मेरिट योजनेत एसजीजीएस अभियांत्रिकी संस्थेची निवड; १८ कोटींचे आर्थिक सहाय्य

नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणाऱ्या श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेची केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेरिट योजनेसाठी झाली निवड.
SGGS Engineering Institute

SGGS Engineering Institute

sakal

Updated on: 

नवीन नांदेड - नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणाऱ्या श्री गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेची केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेरिट योजनेसाठी निवड झाली आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत संस्थेला १८ कोटी रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. आधीपासूनच शैक्षणिक, संशोधन आणि पायाभूत सुविधांनी सक्षम असलेल्या संस्थेला या निधीमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी मोठी झेप घेता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com