दाढी करायची....मग घरुनच आणा टॉवेल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या मर्यादेत सकाळी ७ ते सायंकाळी पाच या वेळेत मुभा देण्यात आली आहे. दहा वर्षाखालील मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, आजारग्रस्त व्यक्ती यांना आरोग्याशिवाय अन्य कारणासाठी बाहेर पडण्यास मनाई. संचारबदी दररोज सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत सुरु राहील. 

नांदेड : जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शनिवारी (ता. २३) सुधारीत आदेश जारी करुन आठवड्यातील सातही दिवस सकाळी नऊ ते पाच दरम्यान मनाई केलेल्या आस्थापना व्यतिरिक्त सर्वांना दुकाने उघडण्यास मुभा दिली आहे. यात चहा टपरी, पानठेले, शासकीय कार्यालय पूर्ण क्षमतने सुरु होणार आहेत. सलूनसाठी मात्र घरुनच टॉवेल न्यावे लागणार आहे. 

शीतपेयांची दुकाने, चहा टपरी, पानठेले सुरु
कापड व रेडिमेड दुकाने, चप्पल बूट, ज्वेलर्स सुरू करण्यास परवानगी; पण दुकानातील मालक व कामगार वगळता एकापेक्षा अधिक ग्राहकांना साहित्य प्रत्यक्ष हाताळण्यास मनाई. वारंवार सनेटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे. लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या मर्यादेत सकाळी ७ ते सायंकाळी पाच या वेळेत मुभा देण्यात आली आहे. दहा वर्षाखालील मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, आजारग्रस्त व्यक्ती यांना आरोग्याशिवाय अन्य कारणासाठी बाहेर पडण्यास मनाई. संचारबदी दररोज सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत सुरु राहील. 

हेही वाचलेच पाहिजे.... 

सलूनसाठी टॉवेल दुसऱ्यास वापरण्यास मनाई
प्रत्येक ग्राहकाने फोनवर पूर्वकल्पना देऊन वेळ ठरविल्याशिवाय प्रवेश नको, प्रत्येक ग्राहकाने स्वतःचा स्वतंत्र टॉवेल, नॅपकिन सोबत आणणे अनिवार्य. नसेल तर प्रवेशास मनाई. एकाचा टॉवेल दुसऱ्यास वापरण्यास सक्त मनाई, सलून साहित्य प्रत्येक ग्राहकास वापरण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक, सलूनमध्ये सेवा देणारा व घेणारा वगळून इतर प्रत्येक दोन ग्राहकांमध्ये तीन फूट अंतर असावे, चार पेक्षा अधिक ग्राहकांना थांबण्यास परवानगी नाही, दाढी, केशकर्तन व सलून झाल्यानंतर खुर्ची प्रत्येक वेळी निर्जंतुक करणे आवश्यक.

हेही वाचा....

काय काय सुरू राहणार
दारुची दुकाने, वैद्यकिय सुविधा पुरविणारे दवाखाने,  क्लिनिक, औषधी दुकाने (चोविस तास), कृषी व जनावरांसाठी आवश्यक साहित्याची विक्री, टॅक्सी, कॅब, रिक्शा चारचाकी वाहने (१ अधीक २ व्यक्ती), दुचाकी वाहने (१ व्यक्ती), जिल्हा अंतर्गत बस सेवा (५० टक्के क्षमतेने), व्यायामशाळा बंद, पण शारीरिक अंतर राखून व्यायामास परवानगी. प्रेक्षक व समूह यांना थांबण्यास मनाई आदेश बजावण्यात आले आहेत.

नवीन आदेशानुसार काय सुरु होणार
मालाचा पुरवठा औद्योगिक आस्थापना (शहरी), औद्योगिक आस्थापना (ग्रामीण), शहरी भागातील सीटू बांधकाम, इतर खाजगी बांधकाम स्थळे, शहरी एकल विक्रेता दुकाने, अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने, ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तू, ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तू, खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये (१०० टक्के उपस्थिती आवश्यक), कृषिविषयक कार्य, बँक आणि वित्त, कुरियर व पोस्टल सेवा, वैद्यकिय अतितत्काळ सेवांची हालचाल, केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, प्रेक्षकांना व्यतिरिक्त स्टेडियम, घरपोच सेवा देणारे रेस्टॉरंट, दुय्यम निबंधक/ RTO/DY RTO, शीतपेयांची दुकाने ही सर्व दुकाने शारीरिक अंतर राखून, दिलेल्या वेळेत, सुरक्षिततेची काळजी घेऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभाची मर्यादा २० वरून ५० वर, ग्राहक जास्त वेळ थांबून राहतील, अशी कोणतीही सेवा देता येणार नाही. फक्त पार्सल सेवा देता येईल. हॉटेल व इतर उपहार गृह यांना किचन सुरू ठेवता येईल. 

बंद राहणाऱ्या आस्थापना
हवाई, रेल्वे व मेट्रो प्रवास, आंतरराज्य मार्ग वाहतूक, शैक्षणिक संस्था, आदरातिथ्य, हॉटेल, शॉपिंग मॉल्स, प्रार्थना स्थळे व मोठ्या प्रमाणावरील जमावाची ठिकाणे बंद राहतील. तसेच ६५ वर्षावरील वृध्द, दहा वर्षाखालील मुले, तसेच गर्भवती स्त्रिया यांना बाहेर ये-जा करण्यावर बंदी राहणार आहे. आंतरजिल्हा बस सेवा, शाळा, कॉलेज, क्लासेस (ऑनलाईन व आंतरशिक्षण वगळून), सिनेमा हॉल, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रम, सभा, मेळावे, व्यायामशाळा, जल तरणिका, सर्व धार्मिकस्थळे, हॉटेल, रेस्टारंट, बार, धाबे, तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाची विक्री पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये केवळ पुरवठा सुरु
कंटेनमेंट झोनमध्ये फक्त मालाचा पुरवठा ही एकमेव सेवा सुरू राहील. शारीरिक अंतर राखले नाही, तर दुकान बंद व पाच हजार दंड, शारीरिक अंतर न ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकने, मास्क न वापरने आदी नियमांचे उल्लंघन केल्यास दुकानदारांना पाच हजार दंड व दुकान बंद. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shave .... then bring a towel from home