esakal | व्यावसायिकांनी घेतली धसकी, दसरा गेला दिवाळीला समाधानकारक विक्री होण्याची अपेक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

दरवर्षी दसऱ्याच्या मुहुर्तावर चारचाकी, दुचाकी आणि फ्रिज, वॅशिंग मशिन यासह टीव्ही आणि सोने चांदींच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. दसऱ्याच्या मुहुर्तावर दुकानात ग्राहकांची गर्दी असते त्यामुळे अनेक ग्राहक ओळखीच्या सोने, चांदी व्यापारी आणि दुचाकी शोरुमवाल्यांकडे दसऱ्यापूर्वीच बुकिंग करुन दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू घरी घेऊन जातात.

व्यावसायिकांनी घेतली धसकी, दसरा गेला दिवाळीला समाधानकारक विक्री होण्याची अपेक्षा 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - दसऱ्याच्या मुहुर्तावर सोने, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, मोबाईल, दुचाकी आणि चारचाकी वाहनास ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल, अशी व्यापारी आणि उद्योजकांना अपेक्षा होती. मात्र, साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर देखील दरवर्षीप्रमाणे यंदा निम्मी विक्री झाली नसल्याने जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना चांगलाच धसका घेतला आहे. 

दरवर्षी दसऱ्याच्या मुहुर्तावर चारचाकी, दुचाकी आणि फ्रिज, वॅशिंग मशिन यासह टीव्ही आणि सोने चांदींच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. दसऱ्याच्या मुहुर्तावर दुकानात ग्राहकांची गर्दी असते त्यामुळे अनेक ग्राहक ओळखीच्या सोने, चांदी व्यापारी आणि दुचाकी शोरुमवाल्यांकडे दसऱ्यापूर्वीच बुकिंग करुन दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्तू घरी घेऊन जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील विक्री झाल्यासारखे वाटते. सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहन यामध्ये कोट्यावधीची उलाढाल होते. 

हेही वाचा- नांदेडातील मटका हायटेक, मोबाईलवरुन आकड्यांची शाळा, कमल यादववर गुन्हा ​

वाहन खरेदी मंदावली-

परंतु यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे सोने, चांदीसह इलेक्ट्रॉनिक आणि वाहन बाजारात मागील वर्षाच्या तुलनेत निम्मी विक्री झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी धसकी घेतली असून, दिवाळीला तरी खरेदीची कमतरता भरुन निघावी, अशी अपेक्षा सराफा व्यापारी, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक बाजारातील व्यापारी, उद्योजक यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा- कोरोना व ओला दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे, श्री रेणुका मातेला साकडे ​

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत शुकशुकाहट

दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी वाहने दोनशेपेक्षा अधिक, चार चाकी वाहने सत्तरपर्यंत विक्री होतात. त्यामुळे दुकानमालकांच्या चेहऱ्यावर हसू फुललेले असते. दुसरीकडे सोने खरेदीसाठी देखील दुकानात गर्दी मावेनाशी होते. यंदा कोरोना संसर्गामुळे एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात प्रवेश देण्याची योजना आखली असताना देखील दिवसभर अनेक सराफा दुकानात ग्राहकांची वाट बघावी लागत होती. 
दुसरीकडे दुचाकी वाहन खरेदीसाठी देखील तितकासा प्रतिसाद दिसून आला नाही. 

इतिहासातील सर्वात थंड दसरा 
कोरोना संसर्गामुळे मध्यमवर्गीयांकडे पैसा नसल्याने यंदाचा दसरा हा सर्वात थंड होता. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. शिवाय शासकीय नोकरदार वर्गांचा देखील चार पाच महिन्यापासून व्यवस्थित आणि वेळेवर पगारी होत नसल्याने यंदा सोने, चांदीच्या दागिण्यांना थंड प्रतिसाद मिळाला. कोट्यावधीची उलाढाल यंदा प्रथमच लाखात झाली, असे म्हणायला हरकत नाही. 
- अनिल धानोरकर, सराफा व्यापारी. 
---