
शनिवारी रात्री आलेल्या अहवालात अन्य १६ जण पॉझिटिव्ह आले. यात कॉँग्रेसच्या आमदाराच्या कुटूंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. त्यामध्ये एक पाच वर्षीय मुलगी आणि सहा वर्षीय मुलाचा समावेश आहे. दिवसभरात पंजाब कोविड केअर सेंटरमधील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ३६५ वर पोहचली आहे. तर २७५ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकूण १६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
खासगी रुग्णालयातील महिला डॉक्टर पॉझिटिव्ह
नांदेड : जिल्ह्यात शनिवारी (ता.२७) सकाळी नांदेडचे एक कॉँग्रेसचे आमदार तर रात्री नऊ वाजता आलेल्या अहवालात अन्य १६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. विशेष म्हणजे, या १६ जणांमध्ये कॉंग्रेसच्या आमदाराच्या कुटूंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. कोरोना बाधित माजी महापौर व त्यांचा नगरसेवक मुलगा यांच्या संपर्कात आल्यामुळे कॉँग्रेसचे एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक : नांदेडचा ‘हा’ आमदार पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहचली
शनिवारी रात्री आलेल्या अहवालात अन्य १६ जण पॉझिटिव्ह आले. यात कॉँग्रेसच्या आमदाराच्या कुटूंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. त्यामध्ये एक पाच वर्षीय मुलगी आणि सहा वर्षीय मुलाचा समावेश आहे. दिवसभरात पंजाब कोविड केअर सेंटरमधील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ३६५ वर पोहचली आहे. तर २७५ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकूण १६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
कंधारला महिला डॉक्टर पाझिटिव्ह
चार दिवसापूर्वीच तालुक्यातील चिखलभोसी येथे कोरोना पाझिटिव्ह रुग्ण सापडले होते. आता कोरोनाने शहरात शिरकाव केला आहे. शुक्रवारी (ता.२६) रात्री येथील खासगी दवाखान्यातील महिला डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कंधारला खऱ्या अर्थाने कोरोनाची लागण झाली असून चिखलभोसी व शहरात कोरोनाच्या शिरकावला लोहा व नांदेड येथील डॉक्टरांचा संपर्क कारणीभूत ठरला आहे. दरम्यान तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या दहा स्वॅब पैकी आठ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात एक जण पॉझिटिव्ह, सातजण निगेटिव्ह तर दोघांचा अहवाल प्रलंबित आहे.
सात जणांचा अहवाल निगेटिव्ह
(ता. १९) जून रोजी लोहा येथील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर कंधार येथील एका खासगी रुग्णालयात सिजरिंग करण्यासाठी आले होते. (ता.२५) जून रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याचे समजताच घबराट पसरली. त्या दवाखाण्याचे पालिकेच्यावतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद फिसके यांनी त्यांच्या टीमसह त्या खासगी रुग्णालयातील दोन डॉक्टर, पाच कर्मचाऱ्यांसह चिखलभोसी येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या कंधार तालुक्यातील लाठी येथील दोन व नंदनवन येथील एक असे दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी नांदेडला पाठवले होते. त्यांचा अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाला. यात शहरातील त्या खासगी रुग्णालयातील महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या आहेत. तर इतर सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
* नांदेड जिल्हा
* एकूण पॉझिटिव्ह - ३६५
* उपचार घेत घरी परतलेले - २७५
* उपचार सुरु - ७४
* मृत्यू - १६