esakal | धक्कादायक : मृतदेह वजिराबाद पोलिस ठाण्यात, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एका ७० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याची तक्रार नातेवाईकांनी करत मृतदेह थेट वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल केला.

धक्कादायक : मृतदेह वजिराबाद पोलिस ठाण्यात, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील गुरु गोविंदसिंग मेमोरीअल शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका ७० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याची तक्रार नातेवाईकांनी करत मृतदेह थेट वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना कायद्यातील बारकावे सांगत त्यांची समजूत काढल्यानंतर मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन नातेवाईक मार्गस्थ झाले 

याबाबत अध्क माहिती असी की, वाशिम जिल्ह्यातील राहणाऱ्या खमरुनिसा बेगम शेख अब्दुल ह्या काही दिवसांपूर्वी हिमायतनगर येथील आपल्या मुलीला भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नांदेडला उपचारासाठी दाखल केले. अगोदर त्यांचे जावई शेख उस्मान शेख सुलतान यांनी त्यांना एका ओळखीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डाॅक्टरनी सांगितले की त्यांची कोरोना चाचणी करावी लागेल. म्हणून तुम्ही त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल करा. यानंतर शेख उस्मान शेख सुलतान यांनी कोरोना तपासणी करुन घेण्यासाठी ता. २५ जुलै रोजी येथील श्री. गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले. ता. २७ जुलै रोजी त्यांची कोरोना चाचणी नकारार्थी (निगेटिव्ह) आली.

हेही वाचानांदेडात भर दुपारी सराफा दुकानावर दरोडा, सराफा गंभीर, लाखोंचा ऐवज लंपास

जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली होती

त्यानंतर निवासी डाॅक्टरनी आपल्या यंत्रणेला सुट्टी देण्यास सांगितले. पण तीन-चार तासांनी परत सांगितले की, सुट्टी देता येत नाही. वरिष्ठांची परवानगी घेऊन नंतर सुट्टी देऊ. यानंतर शेख उस्मान हे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांना भेटले. माझी सासूना मधुमेह, रक्तदाब आणि दमा हे आजार आहेत. त्यांची कोरोना चाचणीही निगेटीव्ह आली. त्यांना घरी जाऊद्या व पुढील औषधी घेणे आवश्य आहे. तरी डाॅक्टरनी त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर शेख उस्मान यांनी ता. २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली. वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे माझ्या सासुला त्यांनी सुट्टी दिली नाही. त्यांना कोरोना नव्हता आणि त्यांच्यावर इतर आजारांचा उपचार आवश्यक होता. परंतु डॉक्टरांनी माझ्या सासूला उपचार न दिल्यामुळे ता. २८ जुलैच्या सायंकाळी सहा वाजता सासूचा मृत्यू झाला.

डाॅक्टरांच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळेच मृत्यू झाला 

बुधवारी (ता. २९) सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह आमच्या ताब्यात दिला. माझ्या सासूचा मृत्यू जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त शल्यचिकित्सक, संबंधीत डॉक्टर जबाबदार आहेत. या सर्वांच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळेच झाला आहे. या सर्वांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार त्यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात दिली. विशेष म्हणजे वजिराबाद पोलिस ठाण्याच्या प्रांगणात मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका उभी करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे आणि त्यांच्या सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शेख उस्मान व त्यांच्या नातेवाईकांची समज काढून मृतदेह पोलिस ठाण्यातून नेण्यास सांगितला. शेख उस्मान आणि त्यांच्या नातलगांनी मृतेदह ठेवलेली रुग्णवाहिका घेऊन ते आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत.