
नांदेड : शहरातील श्री गुरुगोविंदसिंगजी स्मारक शासकीय रुग्णालयातील सर्जरी विभागात उपचार घेत असलेल्या एका रुग्णास चक्क उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. २३) उघडकीस आला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.