धक्कादायक घटना : मुल होत नसल्याने पती- पत्नीची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या..

विनोद आपटे
Thursday, 10 September 2020

मुखेड तालुक्यातील देगाव येथील घटना..सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : लग्न होऊन काही दिवस सुखाचा संसार चालला पण  मुल होत नसल्यामुळे कालातरांने पती- पत्नी मध्ये वादविवाद होत असल्यामुळे  या वादविवादाला कंटाळून दोघेही पती पत्नीनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवार(ता.आठ) रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या दरम्यान मुखेड तालुक्यातील देगाव येथे घडली.

 मुक्रमाबाद पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या देगाव येथे लक्ष्मण विठ्ठल पुल्लेवाड, वय २५)अनुसया लक्ष्मण पुल्लेवाड वय २४ वर्षे  यांचे तीन वर्षापुर्वी अगदी थाटामाटात लग्न पार पडले. मुंबई येथे हाताला मिळेल ते काम करत  दोघांचाही अगदी  सुखाने संसार चालला होता. पण काही दिवस सुखाचे गेल्यानंतर मुल होत नसल्यामुळे दोघां पती ,पत्नीमध्ये वाद होत होते. अनेक ठिकाणी उपचार करूनही यश येत नसल्यामुळे दोघेही तणावात वावरत होते. त्यात लॉकडाऊन पडल्यामुळे हाताचे कामही निघून गेले.

हेही वाचा -  नीट परीक्षेतील विद्यार्थी, पालकांच्या सोईसाठी रविवारी लॉकडाउनमध्ये मुभा -

झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन याञा संपविल्याने

त्यामुळे ते, आपल्या मुळ गावी देगाव येथे आले. गावात काही दिवस राहिल्या नंतर परत पती, पत्नीमध्ये मुल होत नसल्याच्या कारणावरून तिव्र टोकाचे वाद चालत असल्यामुळे या वादविवादाला कंटाळले व आपल्याला मुल होत नाही. आणि आपले वादविवाद हे, आयुष्यभर असेच चालू राहणार यामुळे आपण  दोघेही आपले आयुष्य संपवलेलेच बरे होईल. असे ठरवून हे, दोघेही पती पत्नी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान शेतात असलेल्या आडवळणाच्या ठिकाणी असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन याञा संपविल्याने देगाववर शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपीनाथ वाघमारे करीत आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking incident: Husband and wife commit suicide by hanging themselves with the same rope as they are not having children nanded news