Nanded News: शिपायाच्या नोकरीसाठी लेकीची विक्री; तिसऱ्या अपत्याची अडचण नको म्हणून पित्याचे कृत्य, आईकडून आठ वर्षांनंतर तक्रार
Father Sells Daughter: नांदेड शहरात पित्याने अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपली मुलगी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरेखा यांनी आठ वर्षांनी पोलिसांकडे धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदेड : सरकारी नोकरीसाठी पित्याने चक्क स्वतःच्या मुलीला विकल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात समोर आला. अनुकंपा तत्त्वावर शिपाईपदाची नोकरी मिळविण्यासाठी तिसऱ्या अपत्याची अडचण होईल, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.