esakal | Video- धक्कादायक : खासगी रुग्णालयातून गर्भवतीला काढले बाहेर 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

कोरोना आजाराच्या भितीने शहरातील काही खासगी डॉक्टर चक्क रुग्णालय बंद ठेवून तर शासकीय सेवेतील काही डॉक्टर नावालाच हजेरी लावून घरी बसणे पसंत करत आहेत. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची प्रचंड हेळसाड होत आहे. 

Video- धक्कादायक : खासगी रुग्णालयातून गर्भवतीला काढले बाहेर 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : गावापेक्षा शहरी भागात मोठे व अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णालये असल्याने अनेक रुग्णांची शहराकडे धाव असते. शनिवारी (ता.सहा जून) नर्सी नायगाव येथुन दुपारी दोनच्या सुमारास अशाच एका गर्भवती महिलेला असाह्य वेदना होत असल्याने तीला शहरातील एका खासगी रुग्णालयात आणले होते. परंतु यापूर्वी ती महिला सदर रुग्णालयातकधीच आली नसल्याच्या कारणाने चक्क त्या गर्भवती महिलेला रुग्णालयाच्या गेट बाहेर काढुन गेटला कुलुप लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

नर्सी नायगाव येथील गर्भवती महिला आई वडिलांसह गुरुद्वारा परिसरातील खुरसाळे हॉस्पीटलमध्ये आली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी ३०० रुपये फीस लागेल, असे सांगितले. नातेवाईक फिस भरण्यास तयार झाले, मात्र त्या महिलेची फाईल बघितल्यानंतर गर्भवती महिला यापूर्वी कधीच आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आली नव्हती. या एकमेव कारणामुळे तिच्यावर उपचार करण्यास रुग्णालयातील डॉक्टरांनी चक्क नकार देत महिला व नातेवाईकांना बाहेरचा रस्ता दाखल्याने ती महिला रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच वेदना सहन करत होती. 

हेही वाचा- Corona Breaking: ः गुलजारबागमधील ‘ती’ महिला काल पॉझिटिव्ह, आज मृत्यू​

व्हिडीओ व्हायरल झाल्याने गंभीर प्रकार उजेडात 

गर्भवती महिला व तिचे म्हातारे आई-वडिल सोबत असल्याने त्यांनाही रात्रीच्या वेळी कुठे जावे काहीच कळत नव्हते. परंतु ज्या रस्त्यावर ही महिला होती, तो रस्ता गुरुद्वाऱ्याचा परिसर असल्याने काही अनोळखी व्यक्तीने त्यांची चौकशी केली. तेव्हा संबंधित घटनेचा त्यांनी व्हिडीओ करुन सोशल मीडियावर व्हायरल करून हा गंभीर प्रकार उजेडात आणला. रात्री रुग्णवाहिका मिळत नसल्याने संबंधित शिख बांधवांनी गुरुद्वाऱ्याची रुग्णवाहिका बोलावून दोघा तीघ्यांच्या मदतीने त्या गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केल्याने, पुढील अनर्थ टळला.   

हेही वाचा- Video - नांदेडच्या गोदावरीची अशी आहे चित्तरकथा, कशी? ते वाचाच ​

महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष 

एकीकडे शासन खासगी रुग्णालय बंद न ठेवण्याचे आदेश देत आहे. रुग्णालये अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बंद ठेवलेल्या रुग्णालयांच्या डॉक्टरांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश आहेत. मात्र, असे असले तरी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील शासकीय व काही खासगी रुग्णालयात रुग्णांना अवहेलना सहन करण्याशिवाय कुठलाच पर्याय राहिलेला नाही.  

पुरेसा स्टाप अभावी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याच्या सल्ला दिला
‘ती’ महिला आजारी होती. शिवाय यापूर्वी ती कधी आमच्याकडे आलेली नव्हती. आमचा परिसर कंटेंन्टेंमेंट झोनमध्ये असल्याने आमच्याकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नव्हता. शिवाय गर्भवती महिलेची तब्येत बरी नसल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला मात्र तिला हाताला धरुन रुग्णाला बाहेर काढलेल्याचा असला काहीच प्रकार झालेला नाही. सीसीटिव्ही फुटेज आहेत.
डॉ. सुरेश खुरसाळे