धक्कादायक : चित्रपट कलावंत आशुतोष भाकरे याची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 29 July 2020

मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचे पती आशुतोष भाकरे (वय ३२) याने आपल्या गणेशनगर भागीतल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

नांदेड : इचार ठरला पक्का या मराठी चित्रपटासह अन्य चित्रपटात काम केलेला आणि मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख हिचे पती आशुतोष भाकरे (वय ३२) याने आपल्या गणेशनगर भागीतल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी बुधवारी (ता. २९) एकच्या सुमारास उघडकीस आली.

 
शहराच्या गणेशनगर भागात राहणारा टीव्ही कलावंत आशुतोष गोविंद भाकरे हा मागील काही दिवसांपासून बेचैन होता. बुधवारी सकाळी त्याने सर्वांसोबत नाष्टा केला. गप्पा गोष्टी करुन तो आपल्या खोलीमध्ये गेला. तो परत आलाच नाही. त्याच्या घरच्यानी आशुतोषला आवाज दिला. मात्र त्याच्या खोलीतून आवाज येत नसल्याने सर्वजण धावले. दरवाजा खोलून पाहुले असता आशुतोष हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर घरच्या मंडळीनी शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती दिली. सहाय्यक फौजदार शेख यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाटी दाखल केला. नैराशेतून आशुतोषने आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हे वृत्त लिहिपर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली नव्हती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking: Suicide of film actor Ashutosh Bhakre nanded news